ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पक्षात गटबाजी : जयंत पाटलांनी आटोपले दहा मिनिटात भाषण !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतांना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या‎‎ शिवस्वराज्य‎‎यात्रेच्या‎‎ कार्यक्रमात‎‎ भोकरदन येथे‎‎ रविवारी रात्री ‎‎गोंधळ झाला.‎पक्षातील गटबाजीमुळे हा प्रकार‎घडल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील‎ यांनी संताप व्यक्त करीत भाषण‎करण्यास नकार दिला. मात्र,‎जिल्हाध्यक्ष निसार देशमुख यांनी‎ त्यांची मनधरणी केल्यानंतर जयंत ‎पाटलांनी १० मिनिटांचे आटोपशीर ‎भाषण केले.‎

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार‎गटाचा शिवस्वराज्य यात्रेचा कार्यक्रम‎शांततेत सुरू होता. खासदार अमोल‎कोल्हे, माजी आमदार चंद्रकांत दानवे‎यांच्या भाषणाला कार्यकर्त्यांनी‎जोरदार प्रतिसाद दिला, तर माजी‎मंत्री राजेश टोपे यांचे भाषण सुरू‎असताना जाफराबाद येथील काही‎कार्यकर्त्यांनी भावी आमदार सुरेखा‎लहाने असे बोर्ड झळकावले.

त्याला ‎भोकरदनच्या कार्यकर्त्यांनी जोरदार‎विरोध दर्शवत तत्काळ पोस्टर खाली‎घ्या, असे म्हणत गोंधळ करण्यास‎सुुरुवात केली. दोन्हीकडील कार्यकर्ते‎उठून उभे राहिले. नेतेमंडळींनी‎कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न‎केला तरी १५ ते २० मिनिटे गदारोळ‎सुरूच राहिला. पक्षाच्या‎प्रदेशाध्यक्षांसमाेर च हा प्रकार‎घडल्याने जयंत पाटील चांगलेच‎संतापले. त्यांनी उपस्थितांना‎मार्गदर्शन करण्यास नकार दिला.‎मात्र जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी‎सर्वांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत‎पाटलांची गोंधळाबद्दल माफी‎मागितली. त्यानंतर जयंत पाटील यांनी‎भाषण केले. दरम्यान या प्रकाराची‎जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात‎चांगलीच चर्चा झाली.‎

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!