ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पालकमंत्री गोरे जिल्हा दौऱ्यावर :आ. कल्याणशेट्टी यांच्यासह दिलीप माने यांच्या निवासस्थानी भेट अन मुक्काम !

सोलापूर :  प्रतिनिधी

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे शहराच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बुधवार 2 एप्रिल रोजी ते सोलापुरात मुक्कामी राहणार आहे. या दौऱ्यात अनेक राजकीय नेत्यांच्या निवासस्थानी तसेच संपर्क कार्यालयांना ते भेटी देणार आहेत. यासह जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा आढावा सुद्धा प्रशासनाकडून घेणार आहेत. पहा त्यांचा संपूर्ण दौरा कसा आहे.

 

 

 

 

 

मंत्री जयकुमार गोरे दुपारी ३.३० वाजेपर्यत सोलापूर विमानतळावर आगमन होवून ते अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे भव्य हन्नूर केसरी बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहणार आहे तर पुढे ५.४० वाजता अक्कलकोट येथील श्रीस्वामी समर्थ महाराज मंदिरात दर्शन घेवून आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या निवास्थानी भेट देवून पुन्हा सोलापूरकडे प्रयाण करीत मुक्काम घेणार आहे. तर दि.३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता माजी आ.दिलीप माने यांच्या निवासस्थानी भेट देवून विविध विषयावर चर्चा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!