अक्कलकोट, दि.२५ : हालहळ्ळी अ (ता. अक्कलकोट) येथील ग्रामदैवत श्री हनुमान यात्रा महोत्सवाला बुधवारी २६ एप्रिलपासून प्रारंभ होणार असून ही यात्रा तीन दिवस चालणार आहे. या कालावधीत विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
बुधवारी पहाटे ४ वा. हनुमान मूर्तीला रुद्राभिषेक, तैलाभिषेक, हनुमान चालिसा वाचन, सकाळी ११ वा. नंदीध्वज व पालखी मिरवणूक, गंगास्नान, दुपारी ४ पासून महाप्रसाद, रात्री १० वा. संगीत रसमंजरी-आर्केस्ट्रा होणार असून याचे
उद्घाटन मर्चंट नेव्हीमधील अधिकारी नागनाथ हुक्केरी करणार आहेत. यावेळी गोकुळ शुगरचे अध्यक्ष दत्ता शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील, सरपंच प्रकाश बिराजदार, तंटामुक्तीचे अध्यक्ष गुरुनाथ कळमंडे, गंगाधर वळदड्डे, रमेश व्हसुरे, शरणप्पा बिराजदार आदी उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी दुपारी हनुमानाच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार असून दुपारी ४ वाजता महाप्रसाद वाटप, शुक्रवारी २८ एप्रिल रोजी पहाटेपासून दिवसभर विविध धार्मिक, मनोरंजन, सामाजिक कार्यक्रम, दुपारी ४ वा. जंगी कुस्त्या, महाप्रसाद वाटप, रात्री १० वा. ‘ताईय करळू’ (आईचे हृदय) हे कन्नड नाटक होणार आहे. तीन दिवस महाप्रसाद सेवा असून, ग्रामसेवक श्रीशैल स्वामी, सुभाष ढब्बे, रुपसेन कळमंडे ही सेवा बजावणार आहेत. खीर, कडी- भाताच्या महाप्रसादासाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. यात्रेसाठी मंदिराचे पुजारी हणमंत सुतार, शंकर सुतार, ईश्वर सुतार, अविनाश सुतार यांच्यासह कमिटीचे पंच सिद्धप्पा धनशेट्टी, विश्वनाथ बिराजदार, नागय्या स्वामी, शिवानंद बिराजदार, बसवराज बिराजदार, नागनाथ कळमंडे, लक्ष्मण पाटील हे परिश्रम घेत आहेत.