नागनाथ विधाते/ तालुका दक्षिण सोलापूर
सिंदखेड येथील श्री हनुमान यात्रेला सोमवारपासून प्रारंभ होत आहे.ही यात्रा चार दिवस चालणार आहे.सालाबाद प्रमाणे यावर्षीही श्री हनुमान यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दिनांक 22 रोजी सायंकाळी सहा वाजता श्री हनुमान मुर्तीस व जिवाजी मास्तर यांचे फोटो मिरवणूक व सायंकाळी सात वाजता तेला अभिषेक(यण्णीमज्जन) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवार रोजी पहाटे पाच वाजता श्री हनुमान मूर्तीस रुद्राभिषेक व आठ वाजता नंदीध्वज व पालखी मिरवणूक, दहीहंडी कार्यक्रम व सकाळी नऊ वाजता सुप्रसिद्ध कलगी तुराईचे सवाल जवाब गाणे व सायंकाळी आठ वाजता श्री षडाक्षरी महाराज कणेरीमठ यांचे प्रवचन कार्यक्रम होणार आहे.बुधवारी सकाळी नऊ वाजता कर्नाटकातील सुप्रसिद्ध ढोलकी गाण्याचे कार्यक्रम व महाप्रसाद दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवारी दुपारी चार वाजता तालुक्यातील नामवंत मल्यांचे जंगी कुस्ती तसेच रात्री दहा वाजता सामाजिक कनक कन्नड “मगा होदरु मांगल्य बेकु” हे सामाजिक कन्नड नाटक होणार आहे. तरी सर्व भक्तांनी यात्रेत सहभागी होऊन मंगलमय व पवित्र कार्यक्रम सहभागी होऊन यात्रेत शोभा आणावी.