ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मैत्रीतच जीवनाचे खरे रहस्य !

google.com, pub-1602819151212103, DIRECT, f08c47fec0942fa0

 

मैत्री हे असं नातं आहे, जे माणसाच्या सुख-दु:खांच्या काळात नेहमी बरोबर असतं.अशाच मैत्रीला सलाम करणारा दिवस
म्हणजे ‘फ्रेंडशिप डे’. आता यामध्ये एखाद्या मुलामुलींमध्ये मैत्री असू शकते.एखाद्या स्त्री-पुरुषांमध्ये मैत्री असू शकते.दोन मित्रांमध्ये मैत्री असू शकते ही मैत्री जपण्याची आणि निभावण्याची जबाबदारी दोघांचीही असते.
या मैत्रीतून एक प्रकारचं समाधान मिळते आणि जीवनाला आकार येतो.

 

बऱ्याचदा मैत्रीमध्ये स्वार्थ आडवा येतो, कधी कधी अहंकारामुळे मैत्रीत दुरावा निर्माण करतो,
कधी कधी एकमेकांना आपण नीट समजून न घेतल्यामुळे मैत्रीत दरी निर्माण होते.खरंतर मैत्री हा शब्द दोन अक्षरी सोपा वाटत असला तरी तो निभावणे हार मुश्कील आहे.हे जे जग व्यापलेले आहे ते मैत्री आणि प्रेमातूनच निर्माण झालेले आहे त्याचा मूळ धागा हा मैत्रीचा आहे. खरं तर कधी कधी प्रेमातून मैत्री होते आणि कधी मैत्रीतून प्रेम होते.सर्रास असे प्रकार महाविद्यालयीन जीवनामध्ये घडत असतात. मैत्रीला खऱ्या अर्थाने स्पेस हा महाविद्यालयीन जीवनातच मिळत असतो. बऱ्याचदा एखाद्या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना
भेटलेला मित्र हा आयुष्यभर मित्र राहतो पण या मैत्रीमध्ये अपेक्षांना थारा दिला नाही पाहिजे.जर आपण एखाद्या मित्र-मैत्रिणीकडून अपेक्षा ठेवत गेलो तर शेवटी पदरी दुःख राहते.कधी कधी न मागता मैत्रीतून सर्व काही मिळते पण ज्यावेळी आपण हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी मात्र नाते तुटण्याचा प्रसंगही उद्भवतो खरं तर मैत्री आणि प्रेम या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.प्रेम हे प्रत्येकात होत नसते परंतु मैत्री आणि प्रेम याच जवळचा संबंध आहे.आज जगामध्ये अनेक प्रकारची माणसे आणि नाती भेटतात.प्रत्येक माणूस हा वेगळ्या विचारधारेचा वेगळ्या वर्णनाचा आहे असे असले तरी दिल्लीतला माणूस गल्लीतल्या माणसाबरोबर मैत्री करू शकतो हे देखील तितकेच सत्य आहे.त्याला वेळ किंवा ठिकाणाची गरज भासत नाही.अलीकडे तर समाज माध्यमांद्वारे मैत्रीचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. हरियाणा,राजस्थान,गुजरात, अमेरिकेतला माणूस हा फेसबुकद्वारे थेट आपला मित्र बनून राहिला आहे.मैत्रीच्या कक्षा देखील आता विस्तारलेल्या आहेत त्याला एक प्रकारचं व्यापक स्वरूप यामुळे प्राप्त झाले आहे हे मैत्रीच्या दृष्टीने एका अर्थाने चांगली गोष्ट आहे.कारण प्रत्येकाला व्यक्तिगतरीत्या भेटणं शक्य होत नसते अशावेळी अशा माध्यमांचा वापर चांगल्या पद्धतीने सकारात्मक करून जीवन आनंदी बनवता येईल. खरे तर जगामध्ये रोज अनेक डे साजरे होत असतात पण फ्रेंडशिप डे हा थोडासा वेगळा आहे याचा अर्थ ज्याला समजला तोच नाते कायम टिकवतो असं म्हणायला हरकत नाही.म्हणूनच याचे महत्त्व जीवनामध्ये अधोरेखित व्हावे यासाठी हा दिवस केला आहे असं म्हणायला हरकत नाही. एकमेकांप्रति प्रेम, आपुलकी, बंधुता वाढावी यासाठीच जगभरात ‘फ्रेंडशिप डे’ हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मैत्री हे एक सुंदर नातं असतंच. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना एक तरी जिवलग मित्र आहे. आता ती मैत्री कशी फुलवायची आणि टिकवायची हे प्रत्येकाच्या रिलेशनवर अवलंबून आहे यात विशेष म्हणजे वयाचे बंधन नाही.एखाद्या समविचारी माणसांमध्ये सुद्धा मैत्री निर्माण होऊ शकते अशी अनेक उदाहरणं सांगता येतील अशावेळी जे मैत्री करतात ,चांगल्या पद्धतीने निभावतात आणि मैत्री वाढविण्याचा
प्रयत्न करतात.त्यांना मनापासून शुभेच्छा
तर दिल्या पाहिजेत.

मारुती बावडे,संपादक

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!