मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शिंदे सरकारने मागील महिन्यात लाडकी बहिण योजना घोषित केली होती. त्यावर महायुती सरकारने निर्धारित तारखेच्या ३ दिवस आधीच पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन महिन्यांची रक्कम जमा केली.
या योजनेत दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. जुलैमध्ये नोंदणी केलेल्या महिलांना जुलै व ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे ३ हजार रुपये रक्षाबंधनाच्या आधी म्हणजे १७ किंवा १८ ऑगस्ट रोजी दिले जातील, असे जाहीर करण्यात आले होते. रवी राणा यांच्या वक्तव्याने सरकारच्या योजनेवर शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. तसेच शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांनीही डिसेंबरमध्ये छाननीत विरोधकांचे अर्ज बाद करू, असा धमकीवजा इशारा दिला होता. त्याचा विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची भीती सत्ताधाऱ्यांना वाटू लागली. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी सरकारने निर्धारित तारखेपेक्षा ३ दिवस आधी तातडीने पहिला हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला.
असे जाहीर करण्यात आले होते. रवी राणा यांच्या वक्तव्याने सरकारच्या योजनेवर शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. तसेच शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांनीही डिसेंबरमध्ये छाननीत विरोधकांचे अर्ज बाद करू, असा धमकीवजा इशारा दिला होता. त्याचा विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची भीती सत्ताधाऱ्यांना वाटू लागली. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी सरकारने निर्धारित तारखेपेक्षा ३ दिवस आधी तातडीने पहिला हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला.