मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून मुंबईत पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. लोकल आणि अनेक रेल्वेगाड्या या जागेवरच उभ्या असून याचा फटका प्रवाशांना बसला आहे. एवढेच नव्हे तर अधिवेशनासाठी जाणाऱ्या मंत्री आणि आमदारांना देखील या पावसाचा फटका बसला आहे.
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची रेल्वेगाडी ही ट्रॅकवरच उभी राहिल्याने त्यांनी गाडी सुटण्याची वाट न पाहता थेट रेल्वेट्रॅक वरून पायी चालत निघाले. हातात सामान घेऊन पुढे उभ्या असणाऱ्या दुसऱ्या रेल्वेगाडीत बसून त्यांनी मंत्रालय गाठले.
रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे सकाळपासून अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. बाहेरुन येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या या मध्येच उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. सायन स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पावसाचे पाणी साठल्याने पडल्याने राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे ज्या रेल्वेने मुंबईत येत होते, ती गाडी मध्येच उभी करण्यात आल्याने दोघांना ही रेल्वे ट्रॅकवरुन चालून दुसरी गाडी पकडावी लागली.