ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्रात HMPV व्हायरसची हजेरी

नागपूर, वृत्तसंस्था 

 

HMPV (ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस) ने भारतात हजेरी लावली आहे. चीनमध्ये या व्हायरसने रुग्णालयात रुग्णांची एकच गर्दी होत असल्याचा दावा समाज माध्यमांवर करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्यात सुद्धा या व्हायरसने एंट्री केली आहे. या ह्युमन व्हायरसचे नागपूरात 2 संशयित रूग्ण आढळले आहेत. परिणामी आरोग्य खातं अलर्ट मोडवर आले आहे, केंद्रीय आणि राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. यापूर्वी कर्नाटकात 2, गुजरातमध्ये 1, पश्चिम बंगालमध्ये 1 आणि तामिळनाडू राज्यात 2 प्रकरणे समोर आली होती.

नागपूरमध्ये एक 13 वर्षांची मुलगी आणि एक 7 वर्षाच्या मुलीत ही लक्षणं दिसली आहे. सतत दोन दिवसांचा ताप आल्यानंतर कुटुंबाने एका खासगी लॅबमध्ये तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या अहवालानंतर कुटुंबाला धक्का बसला. या दोन्ही मुलांना रुग्णालयात भरती करण्यात आले नाही. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहे. त्यांची तब्येत चांगली असल्याचे समोर येत आहे.

मुंबई महानगरपालिका पण अलर्ट मोडवर आली आहे. जेजे आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यासाठी मुख्य कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी संशयित रुग्णावर उपचार करण्यात येणार आहे. तर नागरिकांना पण सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

एचएमपीव्ही व्हायरस संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी आरोग्य विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. नागपूरात दोन संशयित रूग्ण सापडल्यानंतर तातडीची बैठक होत आहे. आज दुपारी ३ वाजता सेंट जॉर्ज रुग्णालयातील आरोग्य भवनात आयोजित करण्यात आली आहे.

नागपुरातही ‘एचएमपीव्ही’चे दोन संशयीत रुग्ण आढळले. दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही संशयीत असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता, थोडे वेगळे लक्षणं असल्याने त्यांचे सॅम्पल NIV ला पाठवण्यात आली आहे. दोन्ही मुलांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही आणि दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाले आहे.

“पालकांनी चिंता करण्याची गरज नाही, हा व्हायरस कोरोनासारखा नाही. माईल्ड आहे”. शक्य असल्यास मुलांनी मास्क घालावा, असे आवाहन नागपूर येथील शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!