ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चीनमध्ये HMPV उद्रेक.. भारतात पहिला रुग्ण आढळला

महाराष्ट्र देखील अलर्ट, गाईडलाईन जारी

बंगळुरू वृत्तसंस्था 

कोरोनानंतर आता चीनमधील नवा व्हायरसचा उद्रेक झालाय.  चीननंतर भारतात HMPV चा पहिला रुग्ण सापडला आहे. कर्नाटकच्या बंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात 8 महिन्यांच्या मुलाला HMPV ची लागण झाली आहे. रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांनी एचएमपीव्हीची पुष्टी केली आहे. कर्नाटक आरोग्य विभागाने आयसीएमआर आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला याबाबत माहिती दिली आहे. मुलाचा कोणताही प्रवास इतिहास नाही. म्हणजे त्याने कुठेही प्रवास केलेला नाही. अद्याप नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी पुण्याच्या या संस्थेला नमुने पाठवण्यात आले नाहीत.

दरम्यान हा व्हायरस भारतात येण्याआधी आरोग्य सेवांचे महासंचालक (DGHS) डॉ. अतुल गोयल यांनी सांगितलं की, मानवी मेटापन्यूमोव्हायरस इतर श्वसन विषाणूंप्रमाणे आहे, ज्यामुळे सामान्य सर्दी होते. यामुळे तरुण आणि वृद्ध लोकांमध्ये फ्लूसारखी लक्षणं दिसू शकतात. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल HMPV आणि सीझनल इन्फ्लूएंझाच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या संपर्कात आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापी खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

 

हे करा 

 

जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.

साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.

ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.

संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.

 

हे करू नये 

हस्तांदोलन

टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर.

आजारी लोकांशी जवळचा संपर्क.

डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.

सार्वजनिक ठिकाणी धुंकणे.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!