ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गृहमंत्र्यांची माहिती : राज्यात २३ हजार पदे भरणार !

नागपूर : वृत्तसंस्था

राज्यातील गृह विभागातील १९७६ पासून आकृतिबंधानुसार पदभरती केली जात होती. आता लोकसंख्येनुसार किती अंतरावर पोलिस स्टेशन, कर्मचारी, युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतिबंध तयार करण्यात आला असून या अंतर्गत २३ हजार ६२८ पोलिस शिपाई पदे भरली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

गृह विभागातील पोलिस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. नवीन आकृतिबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलिस भरती करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ८ हजार ४०० लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती, ती वाढवण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत आल्याने उमेदवार निराश झाले होते. यासंदर्भात गृह विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सीसीटीव्ही संदर्भात नियमावली तयार करण्याबाबत गृह विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक हजार लोकांना प्रशिक्षित करून त्याचा उपयोग सायबर गुन्ह्यावर नियंत्रणासाठी होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!