ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हॅलो मेडिकल संस्थेला प्रदान

अक्कलकोट, दि.२४ : राज्य सरकारचायं दाचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार अणदूर येथील हॅलो मेडिकल फाऊंडेशन संस्थेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई येथे पार पडला.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत जनतेस प्रभावीपणे आरोग्य सेवा देऊन लोकांचे राहणीमान उंचावणे, लोकसहभागातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, आरोग्य क्षेत्रात प्रभावी आरोग्य सेवा देणे, आरोग्य विषयक उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे, लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे या उद्देशाने स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, पत्रकार आणि विभागीय कर्मचाऱ्यांसाठी हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार आरोग्य विषयक उत्कृष्ट काम करणाऱ्या हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेला देण्यात आला.

अक्कलकोट, तुळजापूर, उस्मानाबाद, सोलापूर या ठिकाणी या संस्थेने आरोग्य विषयक मोठे काम केले आहे. कुठल्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे जर काम केले तर गौरव होतोच आम्ही देखील आरोग्याच्या विषयावर खूप दिवसापासून काम करत आहोत त्याची दखल राज्य सरकारने घेतली आहे याबद्दल आम्ही समाधानी आहोत, असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत अहंकारी यांनी सांगितले.

संस्थेच्या डॉ. क्रांती रायमाने, डॉ.विजय गायकवाड, बसवराज नरे, नागिनी सुरवसे, जावेद शेख, सतीश कदम यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत, आशिष शेलार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!