ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीदायी ठरेल !

मेष राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी कार्यात गुंतून नाव कमावण्यासाठी उत्तम आहे. दान-पुण्य कराल. व्यापारात तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. कोणी कोणताही सल्ला दिला तरी त्यावर योग्य तो विचार करूनच निर्णय घ्या. तुमचे मन काही गोष्टींमुळे अस्वस्थ असेल. मैत्रीणीसोबत डेटिंगला जाण्याचा योग आहे. घरात छोट्या-मोठ्या कुरबुरी होतील.

 

वृषभ राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीदायी ठरेल. तुमचा कमाई वाढवण्यावर भर असेल. यासाठी तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदलही करु शकता. नोकरी करणाऱ्या लोकांनी सावध राहा. व्यवहार करताना जपून करा, नाहीतर फसवणूक होऊ शकते. आई-वडिलांची सेवा करण्यासाठी तुम्ही दिवसाचा काही वेळ काढाल. तुमचा जोडीदार तुमच्या कामात तुमची पूर्ण साथ देईल.

 

 

मिथुन राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आणि थोडा वेगळा असणार आहे. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना पैसे गुंतवण्याची संधी आहे. समाजाच्या कामात सक्रियपणे भाग घ्याल. कुटुंबात कोणीतरी तुम्हाला आनंददायी बातमी देईल. सासूरवाडीतून तुम्हाला पैसा मिळेल. मुलाच्या काही कृत्यामुळे तुम्ही त्याच्यावर नाराज व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या महिला सहकाऱ्याची चांगली साथ मिळेल.

 

कर्क राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असेल. तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुमच्या उपयुक्त ठरेल. व्यवसायात तुम्हाला आनंददायी बातमी ऐकायला मिळेल. पण कामात थोडासा संयम बाळगावा लागेल. यामुळे काही गोष्टी योग्य पद्धतीने होतील. तुमचा जुना मित्र तुमच्याशी बऱ्याच काळानंतर भेटेल. रागावर नियंत्रण ठेवा.

 

सिंह राशी

आज संपूर्ण दिवस तुमच्या तोंडावर ताबा ठेवा. तसेच वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी दिलेले सल्ले योग्य ठरणार नाही. इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या योजनांवर लक्ष केंद्रित करा. जर तुमचा काही खटला चालू असेल तर एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होतील. तुमची कमाई वाढल्याने तुम्ही खूप आनंदी असाल. कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागतील.

 

कन्या राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यदायी असेल. विदेशातून व्यापार करणाऱ्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. तुम्ही एखादी संपत्ती खरेदी करण्याचा विचार करु शकता. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगा. तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

 

तुळ राशी

आजचा दिवस विद्यार्थ्यांची डोकेदु:खी वाढवणारा असेल. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल थोडेसे चिंतित व्हाल. तुमची कमाई वाढल्याने तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. कुटुंबातील एखाद्या सदस्याला दिलेले वचन वेळेत पूर्ण कराल. बऱ्याच काळापासून अडकलेले काम पूर्ण होईल. एखाद्या सहकाऱ्याशी तुम्ही तुमचे मन मोकळे कराल. तुमची आई एखाद्या गोष्टीवरुन नाराज होईल. बायकोच्या मर्जीनुसार नाही वागला तर नुकसान होईल.

 

वृश्चिक राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगलाही आणि वाईटही असेल. तुम्हाला कामाच्या निमित्ताने लांबचा प्रवास करावा लागेल. अनोळखी लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. जर तुम्ही पूर्वी कर्ज काढले असेल तर त्याची आज परतफेड कराल. आज तुमच्या मनात नकारात्मक विचार आणू नका. तुम्हाला कामकाजाच्या क्षेत्रात मान-सन्मान मिळेल.

 

धनु राशी

आज घरातील भांडणांपासून कलहातून सुटका होईल. सरकारच्या काही योजनांमध्ये पैसा गुंतवायचा विचार करु शकता. घरात वाद होईल. व्यवसायात काही बदल करावे लागतील. तुमच्या कामांमुळे जोडीदाराला कमी वेळ द्याल. त्यामुळे जोडीदार नाराज होईल. आज कुणाकडूनही पैसे उधार घेऊ नका. वाहन खरेदीचा योग आहे. जमिनीचा तुकडा विकण्याचा विचार कराल. प्रेयसीची नाराजी ओढवून घ्याल.

 

मकर राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा उलटसुलट जाऊ शकतो. तुमच्या प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल. नवीन काम सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांना चिंता वाटू शकते. आज तुम्हाला धार्मिक गोष्टींत रस असेल आणि तुम्ही खूप धैर्यवान व्हाल. पण, एखाद्या सहकाऱ्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. आज कोणतेही महत्त्वाचे काम इतरांच्या हाती देऊ नका.

 

कुंभ राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळ करणारा असेल. तुम्हाला जास्त काम करावे लागेल. जर तुम्ही कोणत्याही कामासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते तुम्हाला सहज मिळेल. भाऊ-बहीण तुमच्या कामात साथ देतील, पण नोकरीत मात्र तुम्हाला बॉसकडून ओरडा मिळेल. जेवणावर नियंत्रण ठेवले नाही तर तुमचा जुना रोग पुन्हा उद्भवू शकतो. आर्थिक स्थितीबद्दलची चिंता दूर होईल.

 

मीन राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी सुख-सुविधा वाढवणारा असेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. बऱ्याच कालावधीनंतर तुमच्या काही मित्रांची भेट होईल. तुम्हाला वरिष्ठांकडून काही सल्ला मिळू शकतो. तुमच्या जोडीदाराबरोबर सुरु असलेले रुसवे-फुगवे दूर होतील. नोकरी शोधणार्‍यांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता. नातेवाईकांसोबतचं नातं अधिक घट्ट होईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!