मुंबई : राज्य सरकारकडून बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतल्याचं जिर काढण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग व त्यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला उद्भवणारा धोका लक्षात घेता २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील इ. १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याबाबतचे शासकीय आदेश आज काढण्यात आले. (१/२) pic.twitter.com/iSKFeHMqtC
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 11, 2021
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भातील शासन आदेश ट्विटरवर शेयर केला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या विचार करता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा रद्द करण्यात येत आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्थरावर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात यावे, असे या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.