---Advertisement---

पश्चिम बंगालमध्ये भाजपला धक्का; मुकुल रॉय स्वगृही परतले.

Follow Us:
---Advertisement---

पश्चिम बंगाल: तीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेलेले मुकुल रॉय यांनी काल शुक्रवारी तृणमूल काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसलेल्या मोठ्या झटक्यानंतर मुकुल रॉय यांचा तृणमूल प्रवेश भाजपच्या केंद्रीय नेत्यांना धक्का समजला जातो.

बंगालमध्ये भाजपच्या दारुण पराभवानंतर आपला तृणमूल प्रवेश व्हावा म्हणून मुकुल रॉय प्रयत्नशील होते. त्यांच्या तृणमूलमधील अनेक नेत्यांशी पडद्याआड चर्चा सुरू होत्या. त्यांनी स्वतःला भाजपपासून दूरही ठेवले होते.

अखेर काल शुक्रवारी दुपारी ३ वाजता मुकुल रॉय यांनी शहरातील तृणमूल भवनात प्रवेश केला. मुकुल रॉय यांनी आपण भाजप सोडून तृणमूलमध्ये आलो आहोत.ममता बॅनर्जी यांनीही मुकुल रॉय यांचे पक्षात स्वागत करत त्यांना पक्षात महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात येईल, अशी घोषणा केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!