ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली.या विजयामुळे पदाधिकारी
व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून सोमवारी हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येत या विजयाचा जल्लोष साजरा केला. अक्कलकोट शहरातील प्रमुख चौकांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करून मिरवणूक काढून अक्कलकोट येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये येऊन पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात पंचायत समितीवर स्पष्ट बहुमत आले आहे. चपळगाव गट आणि गणामध्येही विजय मिळाल्याने या विजयाच्या आनंदात मोठी भर पडली.गावोगावच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार कल्याणशेट्टी यांच्यासह नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, शांभवी कल्याणशेट्टी,बंधू सागर कल्याणशेट्टी यांना भेटून आनंद व्यक्त करत सत्कार केला. पंचायत समिती जेऊर गणातून विमल गव्हाणे हे विजयी झाल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी एक घागर दुधाने अभिषेक केला. ज्या ज्या ठिकाणी भाजपने विजय प्रस्थापित केला.
त्या त्या मतदारसंघातील गावांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

यावेळी बोलताना नूतन जिल्हा परिषद सदस्य शांभवी कल्याणशेट्टी म्हणाल्या, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा कायापालट करणे हेच माझे ध्येय राहील. जनतेने कायमच कल्याणशेट्टी परिवारावर विश्वास दाखवलेला आहे.या निकालाच्या निमित्ताने पुन्हा एकदा
ते सिद्ध झाले आहे,असे त्या म्हणाल्या. यावेळी ज्येष्ठ नेते सिद्धप्पा कल्याणशेट्टी, मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील,ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव,शिवशरण जोजन,नूतन पंचायत समिती सदस्य नोद मोरे,राहुल काळे,सिद्धाराम टाके,अमोल हिप्परगे,वैजिनाथ अळळीमोरे,अप्पासाहेब पाटील,सैपन शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!