मेष : श्रीगणेश म्हणतात, आज समर्पित वृत्तीने केलेल्या कार्याचे सकारात्मक परिणाम मिळतील. जमीन किंवा वाहन खरेदी किंवा विक्रीसाठी वेळ अनुकूल आहे. कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात कोणताही निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल. घरात आनंदी वातावरण असेल.
वृषभ : श्रीगणेश सांगतात की, तुमच्या प्रामाणिक मेहनतीचे अर्थपूर्ण फळ मिळेल. बराच काळानंतर मित्रांबरोबर झालेली भेटीने आनंद मिळेल. मुलांवर अधिक निर्बंध लादू नका. व्यवसायाशी संबंधित कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. पती-पत्नींच्या नात्यात गोडवा येईल. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : श्रीगणेश म्हणतात की, भविष्यातील ध्येयांवर लक्ष केंद्रित करुन कार्यरत राहा, तुम्हाला नक्कीच यश मिळू शकते. काही नवीन संपर्क स्थापीत होतील. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवणे हानिकारक ठरु शकते. वैयक्तिक आणि व्यावसायिक कामांमध्ये चांगला समन्वय राखता येईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका.
कर्क : श्रीगणेश सांगतात की, कुटुंबात काही मतभेद असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होतील. मानसिक शांती मिळविण्यासाठी काही काळ एकांतात रहा. व्यावसायिक कामे सामान्य राहतील.
सिंह : श्रीगणेश म्हणतात की, दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करा. ग्रहांची परिस्थिती अनुकूल आहे. वैयक्तिक आणि आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी महत्त्वाची योजना असू शकते. घर नीटनेटके ठेवण्यात व्यस्त असाल. आळसामुळे महत्त्वाची कामे टाळू नका. कोणतीही अप्रिय बातमी तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते.
कन्या : श्रीगणेश सांगतात की, आज महत्त्वाचे काम मार्गी लागल्याने आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. समस्या संवादाद्वारे सोडवाल. शेजाऱ्यांशी वादांपासून दूर राहणे चांगले. इतरांकडून अपेक्षा करण्याऐवजी स्वतःच्या कौशल्यांवर विश्वास ठेवा.पती-पत्नीमध्ये चांगले संबंध राहतील.
तूळ : श्रीगणेश म्हणतात की, परिस्थिती हळूहळू तुमच्यासाठी अनुकूल होत आहे. रागामुळे तुमचे काम बिघडणार नाही, याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. वाहन चालवताना काळजी घ्या.
वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, आज कुटुंबातील समस्या शांततेने सोडवू शकाल. आर्थिक पातळीवर परिस्थिती आव्हानात्मक असेल. विद्यार्थ्यांनी चुकीच्या कामांमध्ये आपला वेळ वाया घालवू नये. व्यवसायातील ताण तुमच्या वैवाहिक जीवनात येऊ देऊ नका. आरोग्य चांगले राहिल.
धनु : श्रीगणेश सांगतात की, तुमच्या सभोवतालचे वातावरण आरामदायी असेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. सकारात्मक लोकांच्या संपर्कात रहा. व्यवसायात सर्वकाही गांभीर्याने करा. कुटुंबातील वातावरण थोडे तणावपूर्ण असेल. पोटदुखीचा त्रास जाणवेल.
मकर : श्रीगणेश म्हणतात की, कठोर परिश्रमाचे योग्य फळ मिळेल. सर्वकाही असूनही तुम्हाला जीवनात काही विचित्र बदल अनुभवता येतील. आत्मचिंतनात थोडा वेळ व्यतित करा. आर्थिकदृष्ट्या कोणतेही सकारात्मक परिणाम मिळू शकत नाहीत. व्यावसायिक कामांमध्ये व्यस्त राहू शकता.
कुंभ : श्रीगणेश सांगतात की, आज दैनंदिन कामकाज आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे समन्वय साधणे आव्हानात्मक असू शकते. तुमच्या जवळचे काही लोकच कामात अडथळा आणू शकतात. मौजमजेवर लक्ष केंद्रित न करता तुमची कामे पूर्ण करा. व्यवसायाशी संबंधित नवा करार होण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घ्या.
मीन : श्रीगणेश म्हणतात की, इच्छित कामे वेळेवर पूर्ण झाल्यास मन आनंदी राहील. प्रत्येक आव्हान स्वीकारा. विशेषतः महिलांनी घरात आणि बाहेर योग्य समन्वय राखला पाहिजे. सर्वकाही असूनही तुम्ही कोणत्याही प्रकारची शून्यता अनुभवू शकता. पती-पत्नीमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम जाणवू शकतो.