ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पती दिर जाऊ यांनी केला पत्नीचा गळा दाबून खून; प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीचा खून वागदरी गावावर शोककळा

अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील एका कुटुंबात प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीचा कुटुंबातील तिघांनी मिळून गळा दाबून खून केला आहे.पुतळाबाई शिवराज मलगोंडा वय ३३ रा हनूरनाका ता अक्कलकोट असे मयत महिलेचे नाव असून.ही घटना दि ३० जून सकाळी ११ वाजता निदर्शनास आली.पती,दिर व जाऊ यांच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी पतीस ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत पुतळाबाई शिवराज मलगोंडा ह्या आपले पती शिवराज सोबत हनूर नाका अक्कलकोट येथे वास्तव्यास होते. मयत पुतळाबाई यांची सासरी मोठी प्रॉपर्टी असून पती शिवराज मलगोंडा यांना दारू पिण्याचे व्यसन असल्याने प्रॉपर्टीचे कामकाज दिर देवराज बसवराज मलगोंडा हे पाहतात. मयत पुतळाबाई सोबत पती शिवराज व दिर देवराज हे प्रॉपर्टीवरून वाद करून पुतळाबाईस त्रास देत होते. आणि चारित्र्यावरुन संशय घेत छळ करत होते.

या विषयी पुतळाबाई ह्या आपल्या माहेरी वागदरी ता अक्कलकोट येथे आल्यावर आपल्या आई वडिलांना होणाऱ्या त्रासाविषयी सांगायच्या. त्यानंतर पुतळाबाईचे आई वडील सासरच्या लोकांची समजूत काढून याचेचे तरीही सासरचे लोक मयत पुतळाबाईस त्रास द्यायचे.दि ३० जून रोजी मयत पुतळाबाई मलगोंडा राहत्या घरी बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत असल्याचे शेजारी लोकांनी वडील मल्लिनाथ शेळके यांना फोनद्वारे कळवताच आई वडील भाऊ व गावातील इतर लोक मयत पुतळाबाई मलगोंडा यांच्या घरी गेले त्यावेळी पुतळाबाई ह्या बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या.घटनास्थळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

पोलिसांनी मयत पुतळाबाई यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तपासणी केले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले. सदर मयताची खबर वडील मल्लिनाथ आप्पासाहेब शेळके यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली.मयताचा पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदन करून डॉक्टरांनी गुदमरून मयत झाल्याचे प्रमाणपत्र दिले.या अगोदर म्हणजे दि २४ जून रोजी सायंकाळी ७ वाजता मयत पुतळाबाईस पती शिवराज यांने चारित्र्याचा संशय घेऊन लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. याबाबत दि २५ जून रोजी पती शिवराज दिर देवराज व जाऊ गंगोत्री मलगोंडा यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून त्याच दिवशी माहेरी ( वागदरी ) गेले होते.

दि २८ रोजी सासरी निघून गेल्या.दि ३० जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास मयत पुतळाबाई शिवराज मलगोंडा वय ३३ यांचे सासरी मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी असून याबाबत सतत वाद चालू होते.पती शिवराज दिर देवराज व जाऊ गंगोत्री हे सर्वजण मयत पुतळाबाईस तुला प्रॉपर्टी वाटून देणार नाही असे म्हणत चारित्र्यावर संशय घेत वेळोवेळी लथाबुक्यांनी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केली होती.दि ३० रोजी मयत पुतळाबाई मलगोंडा यांना वरील संशयित आरोपी पती दिर व जाऊ यांनी मिळून नाकातोंडावर उशी सारख्या वस्तूने दाबून तिला ठार मारले आहे म्हणून पती शिवराज बसवराज मलगोंडा रा हनूर नाका अक्कलकोट, दिर देवराज बसवराज मलगोंडा व जाऊ गंगोत्री देवराज मलगोंडा दोघे रा फत्तेसिंग मैदान बाजूला अक्कलकोट यांच्या विरुद्ध बसवराज मल्लिनाथ शेळके वय ३६ रा वागदरी यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गुन्हा निदर्शनास येताच आरोपी शिवराज बसवराज मलगोंडा यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!