महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यावर मी ठाम ; थोरात-राऊतांच्या दिल्ली भेटीवर नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया
पुणे : महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यावर मी ठाम आहे. तथापि स्थानिक नेत्यांशी बोलून चाचपणी केली जाईल. नंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यातील वाद आता दिल्लीत पोहोचला आहे. नाना पटोलेंशी झालेल्या मतभेदामुळे मंत्री नितीन राऊत पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झालेत. नाना पटोले आणि मंत्री नितीन राऊत यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आज दौर्यावर गेले आहेत. या संदर्भात प्रश्न विचारले असता पटोले सांगीतले कि, आमच्या पक्षात कुठल्याही प्रकारचा वाद नाही. मंत्री दिल्लीत त्यांच्या-त्यांच्या कामा निमित्त जात असतात. तसेच नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात गेले असावेत असं नाना पटोले यांनी सांगितले.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आज दिल्ली दौर्यावर गेले आहेत. मंत्री नितीन थोरात आणि मंत्री बाळासाहेब राऊत थोड्याच वेळात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची 10 जनपथ निवासस्थानी भेट घेणार आहेत. राज्यात सुरू असलेल्या पक्षाअंतर्गत कुरबुरीची तक्रार मंत्री नितीन राऊत आणि मंत्री बाळासाहेब थोरात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.