ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे…! माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं, – विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केलेल्या एका विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही, असे जाहीर विधान देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केलं आहे.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत होते. यावेळी एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान करून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना तोंड फोडले आहे.

”मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे,” असं फडणवीस म्हणाले.

गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला जनतेनेही कधी मी मुख्यमंत्री नसल्याचं जाणवू दिलं नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम काम करत आहे. ज्या दिवशी मला जनतेचा आशीर्वाद मिळेल त्या दिवशी इथे मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईन. त्यामुळे त्याची काळजी घेऊ नका. मी नक्की येईन. तुमचं निमंत्रण मी आजच स्विकारतो, असंही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!