पुणे : वृत्तसंस्था
बारामती व्यापारी महासंघ आणि दी बारामती मर्चंट असोसिएशन तर्फे आज बारामतीमध्ये व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात खा.सुप्रिया सुळे बोलत होत्या. ‘दिल्लीत मंत्री होता आलं असतं, मात्र आम्ही संघर्ष आणि सत्याचा मार्ग निवडला’, असं वक्तव्य शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
त्या म्हणाल्या की, ”मी दिल्लीत मंत्री झाली असती आणि रोहित पवार राज्यात मंत्री झाले असते. सत्ता आणि अदृश्य शक्ती, दुसऱ्या बाजूला वडील, विचार, संघर्ष आणि सत्य होतं. तुम्ही (कार्यकर्त्यांना उद्देशून त्या असं म्हणाल्या) माझ्या जागी असता तर काय केलं असतं, कोणत्या बाजूने बसला असता, सत्याच्याच.”
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”बारामती हे पुरोगामी महाराष्ट्राचे एक मोठं केंद्र आहे. आम्ही रोज संघर्ष करत आहोत. बारामतीमध्ये त्यांच्याकडे एक कार्यकर्ता नाही, माझ्या विरोधात उभं करायला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना आमचं घर फोडावे लागले.” सुळे म्हणाल्या, ”अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे. 5 कोटी रुपयांचा मांडव उभा केला. होता महा रोजगार मेळाव्यासाठी. यातील कोटी नोकऱ्या 8 मेपर्यंत कायमच्या आहेत, ते बघा.”
अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ”केजरीवाल यांना तुम्ही अटक करता आणि ज्या आदर्श घोटाळ्याचे आरोप तुम्ही अशोक चव्हाण यांच्यावर केले, तर त्यांच्यावर कारवाई नाही केली. काँग्रेस भ्रष्टाचारी म्हणून 2014 मध्ये घरी पाठवले. सगळ्यात भ्रष्टाचारी पक्ष भारतीय जूमला पार्टीला हद्दपार करायची वेळ आहे.”