ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मला बाबा धाकच बसला : मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा टीका !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आता राज्यातील मराठा समाजाचे नवीन नेते म्हणून ओळखळे जावू लागले आहे. त्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. मला बाबा धाकच बसला, त्या माणसाचा. आम्ही सुसंस्कृतपणा तुमच्याकडून का शिकावा भुजबळ? पाय तोडण्याची भाषा करणारे तुम्ही आम्हाला काय शिकवणार? तुमचे तुम्ही बघा, आम्ही आमचे पाहतो, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांना मुंबईकरांना आंदोलनावेळी सहकार्य करण्याचेही आवाहन केले.

मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करत 20 तारखेनंतरच्या आंदोलनावेळी मुंबईकरांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. छगन भुजबळ गोरगरीब धनगर व मुस्लिमांसाठी आम्ही लढणार. पण ते मराठे व ओबीसीत भांडण लावण्याचे काम करत आहेत. त्यांनी कितीही प्रयत्न केले, तर आमचे प्रेम तुटू शकत नाही, असे जरांगे म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी त्यांना सरकारला दिलेल्या कथित वेळेविषयी छेडले असता त्यांनी सरकारला कोणताही वाढवून वेळ दिला नसल्याचे ठणकावून सांगितले. आम्ही सरकारला 4 दिवस दिले, तेव्हा सरकारने आम्हाला 4 दिवसांत कायदा पारित होणार नाही असे सांगितले. त्यामुळे एक महिन्याचा वेळ दिला. आम्ही कायदा मंजूर करण्यासाठी 40 दिवस दिले. त्यांनी केवळ अहवाल तयार केला आणि स्वीकारला. माझ्याकडून समाजाला फसवण्याचे पाप होणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

17 डिसेंबरला झालेली सभा निर्णायकच होती. आमचे आंदोलन छोटे नाही. आम्हालाच वेळ कमी पडत आहे. मी स्टेजवरून 25 डिसेंबरला मुंबई चलोची घोषणा केली असती, तर लोक दणादणा निघाले असते. पण त्यानंतर 2 दिवसांत माघारी येण्याची वेळ आली असती. देशात यापूर्वीही लाखोंच्या संख्येने आंदोलने झाली. पण ती मोडली. का मोडली, त्याची कारणे तपासावी लागतील. लोक मागे आहेत म्हणून भावनेच्या आहारी जावून कोणतेही निर्णय घ्यायचे व समाजाची फसवणूक करायची हे माझ्याकडून होणार नाही. मुंबई हा काही 50 किमी जावून पुन्हा माघारी यायचा विषय नाही. तिथे जावून जिंकून यायचे आहे, असे जरांगे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!