ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘’मी कुठल्याही पक्षात जाणार नाही; मी भाजप सोबतच’’ – पंकजा मुंडे

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंकज मुंढे म्हणाल्या की, ‘मी भाजप सोबतच.. कुठल्याही पक्षात जाणार नाही’ असं स्पष्ट सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या कि, मला सोनिया गांधी, राहुल गांधी यांना कधीच भेटलेले नाही. माझी गांधी कुटूंबियात ओळख सुद्धा नाही. माझ्याबाबत चुकीची अफवा पसरवली जात आहे. जनतेला आता पाडापाडीच्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. असे देखील पंकजा मुंडे यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षातील प्रवेशाची चर्चा फेटाळून लावताना त्यांनी आजच्या राजकारणावरही भाष्य केलं. ‘आजच्या राजकारणात वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतायत. आजचं राजकारण कोविडसारखं आहे. जसा कोविड आपण कधीच पाहिला नव्हता, तसंच राजकारणातले आजचे प्रयोग आपण कधीच पाहिले नव्हते, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली. जेव्हा जेव्हा मला तिकीट भेटले नाही त्यावेळी प्रतिक्रिया दिली नाही, मी नाराज नाही पण दुखी आहे. अनेकदा डावलुनही मी कधीच नाराजी व्यक्त केली नाही असे स्पष्ट मत मुंडे यांनी पत्रकार परिषदेत मांडले आहे, भाजप फुटेल असा दिवस येऊ नये अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.

तत्पूर्वी, पंकजा मुंडे यांनी कॉंग्रेस वरिष्ठांच्या घेतलेल्या भेटीला कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. पंकजांनी या भेटीत पक्ष प्रवेशाच्या मुद्यावर विस्तृत चर्चा केली. सांगलीच्या एका बड्या नेत्याकडून पंकजा मुंडेंसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी आपल्या कानावर हात ठेवले आहेत. पंकजा मुंडेंच्या कॉंग्रेस प्रवेशासंबंधीची मला कोणतीही माहिती नाही. पण पंकजाताई कॉंग्रेसमध्ये येणार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!