---Advertisement---

पावसाळी अधिवेशनापुर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का ; विधान परीषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत केला प्रवेश

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : पावसाळी अधिवेशनापुर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधान परीषद उपसभापती आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोऱ्हेंनी प्रवेश केला निलम गोऱ्हे यांच्या पक्ष प्रवेशावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे अनिल परब म्हणाले कि, आपल्याला काही मिळत नाही, म्हणून पक्ष सोडणारे भरपूर आहेत, असं असलं तरी पक्षाच्या वाईट दिवसात लाखो कार्यकर्ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. संधीसाधू लोक गेले असतील, तर त्यांची जागा आम्ही भरून काढू. पण, सगळी पदे उपभोगल्यानंतर पक्षाला दगा देणे व वार करणे हे उच्च पदाधिकाऱ्यांना शोभत नाही, असे ते म्हणाले.

शिवसैनिकांच्या मेहनीतवर नीलम गोऱ्हे यांनी चार वेळा आमदारकी उपभोगली. याबद्दल त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. परंतु ज्या शिवसैनिकांच्या जोरावर त्यांनी ही सगळी पदे उपभोगली, त्या शिवसैनिकांना हे पाहून किती यातना होत असतील, याचा विचार करावा. असे परब म्हणाले

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!