अक्कलकोट: यंदा पाऊस मोठया प्रमाणात झाल्यामुळे गोगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र संपूर्णपणे गळत असून त्याठिकाणी उपकेंद्रमधील असलेले सर्व दप्तर, औषध, गोळ्या, लस, आणि इतर साहित्य भिजून खराब झालेले आहेत. त्यामुळे परिसरातील रुग्णावर उपचार करण्यासाठी अडचण होत असल्याचे माहिती उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांना मिळाल्यावर त्यांची त्वरित दखल घेत उपसरपंच यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. लिंगराज नडगेरी यांच्या समवेत पाहणी करून याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य सभापती, जिल्हा परिषद पक्ष नेता तथा आरोग्य समिती सदस्य अणाप्पा बाराचारी यांच्याकडे निवेदनद्वारे आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती साठी निधीचे मागणी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी केले आहे.
यावेळी बोलताना कमलाकर सोनकांबळे यांनी म्हणाले की, ग्रामीण भागात आरोग्य सेवेची अत्यंत आवश्यक असून या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी , आरोग्य सेविका, आशा वर्कस असून ही केवळ उपकेंद्र दुरुस्ती नसल्याने सेवा देणे वैद्यकीय अधिकारी यांना अडचण येत असून सध्या कोव्हिडं काळात आरोग्य व्यवस्था साठी गावात एकच ठिकाण असून सदर उपकेंद्र दुरुस्ती झाल्यास परिसरातील लोकांना आरोग्य सेवेचे लाभ घेता येईल, त्याकरिता त्वरित निधी देण्याचे मागणी केले.
यावेळी बसवराज सोनकांबळे, भाजपा अनु जाती जमाती तालुकाध्यक्ष निजप्पा गायकवाड, गौतम बाळशंकर, आदीने उपस्थित होते