ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : १२ दिवस राहणार बँक बंद !

मुंबई : वृत्तसंस्था

जुलै महिन्यात तब्बल १२ दिवस जवळपास सर्वच बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमची मोठी गैरसोय देखील होऊ शकते. म्हणून मोजके काही दिवसच हातात शिल्लक असल्याने होता होईल तेवढी कामे आताच निपटून घ्या. नंतर कोणतेही काम होणार नाही.

जुलै महिन्यात १२ दिवस बँकांमध्ये कोणतीही काम होणार नाही. देशात अनेक कारणांमुळे विविध ठिकाणी सहा दिवस बँका सुरू राहणार नाहीत. याशिवाय चार रविवार आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँका पूर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच मोहरम सणाच्या निमित्ताने १७ जुलै रोजी देशातील बहुतांश भागात बँका बंद राहणार आहेत.
बँकांना सुट्टी असूनही तुम्ही ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैशांचे व्यवहार करू शकता किंवा इतर कामे करू शकता. बँकांच्या सुट्यांचा या सुविधांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, जुलै महिन्यात नऊ दिवस शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. याशिवाय १७ जुलैला मोहरम सण असल्याने त्यादिवशी शेअर बाजार देखील बंद राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!