सध्या अनेक लोकांना मधुमेह किंवा Diabetes हा आजार सामान्य झाला असून आजकालची जीवनशैली, त्याच्याशी निगडित खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे बहुतांश लोक याला बळी पडत आहेत. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीर इन्सुलिन संप्रेरकाचे योग्य प्रकारे उत्पादन किंवा वापर करण्यास असमर्थ असते. ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते, ज्यामुळे अनेक आजार होतात. अशावेळी मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची, दिनचर्येची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
आहारात कोणत्या पिठाचा समावेश करावा?
मधुमेहाच्या रुग्णांना भात आणि गव्हाची पोळी किंवा चपाती खाण्यास मनाई असते किंवा प्रमाणात खावी असं सांगितलं जातं. तरीही, बहुतेक लोक गव्हाचे पीठ वापरतात, कारण पर्यायच माहीत नसतो. मधुमेहाच्या रुग्णांना भात आणि पोळी, चपाती, रोटी, पराठे किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेले इतर पदार्थ टाळावे लागतात. पण मग खायचं काय असा प्रश्न अनेकांना पडतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी आपल्या आहारात कोणते पीठ आणि धान्याचा समावेश करावा हे आयुर्वेद डॉक्टरांकडून जाणून घ्या. ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहील.
डायबेटीससाठी आहार
आज मधुमेहाच्या रुग्णांच्या आहारपद्धतीत बरेच बदल करण्याची गरज आहे. मधुमेहाच्या रुग्णांना न शिजवलेला किंवा कच्चा आहार जसे फळे, हरभरा, कोशिंबीर इत्यादी दिला तर चालतो किंवा इतर कडधान्य जी आपण पाण्यात भिजवून फुगवून खाऊ शकतो तीही चालतात. मोड आलेली कडधान्ये दिली तर आणखी चांंगले. उदाहरणार्थ हरभरा खायचा असेल तर हरभरा अंकुरित खा, नाचणी किंवा नाचणीची पोळी खायची असल तर नाचणी अंकुरून मग त्याचे पीठ तयार करून पोळी किंवा डोसा किंवा इडली वगैरे खाणे मधुमेहींसाठी स्वादिष्ट आणि आरोग्यदायी ठरेल.
साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी सुयोग्य धान्य
इन्सुलिन निर्मितीला चालना मिळेल अशी धान्य जेवणात असली पाहिजेत. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. याशिवाय सावा, कोडो, बाजरी, मका अशी इतरही भरड धान्ये आहेत ज्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील. या धान्यांमुळे साखरेची पातळी फारशी वाढत नाही आणि वाढली तर हळूहळू नॉर्मल होण्यास मदत होईल.
तसेच जेव्हा तुम्ही आहार घेता किंवा भरड धान्य घेता तेव्हा आहार किंवा भरड धान्य, कोशिंबीर, फळे, फुले इत्यादींचे सेवन करण्यापूर्वी ते औषधाचे काम करते. शरीरात रक्ताची, ग्लुकोजची पातळी वाढली आहे, ती हळूहळू कमी होत जाईल.
शरीरातील रक्त, ग्लुकोजची पातळी नॉर्मल झाली तर तुमचे आरोग्य चांगले राहील. यासाठी आपल्या आहाराची काळजी घेणे, दिनचर्या सुधारणे आणि दररोज अर्धा तास शारीरिक श्रम करणे, मॉर्निंग वॉक, व्यायाम आणि मातीवर, हिरवळीवर अनवाणी पायांनी चालणे इत्यादी. आपल्या दैनंदिन दिनक्रमात या सर्वांचा समावेश केल्याने शरीर लवकर पूर्ववत होण्यास मदत होते. तर तुम्ही सामान्य जीवन जगू शकाल.