दिल्ली : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १३ वा हप्ता नव्या वर्षात जानेवारी महिन्यात जाहीर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने १५ जानेवारीच्या आत ती जारी केली जाऊ शकते. पीएम किसान योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ६००० रुपये ३ समान हप्त्यांमध्ये देते. दरम्यान १३ व्या हप्त्ता देण्यासंदर्भात सरकारने अद्याप कोणतेही अधिकृत घोषणा केलेली नाही.
जर तुम्ही १३ व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर त्यासाठी तात्काळ ई केवायसी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी सर्वप्रथम, तुमची स्थिती तपासण्यासाठी, पीएम किसान पोर्टलवर जा आणि लाभार्थी स्थितीवर टॅप करा किंवा क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून १३ व्या हप्त्याची स्थिती तपासा.समोर उडलेल्या पेजमध्ये अनेक तपशील असतील. पण तीन ठिकाणी YES लिहिल्यास तुमचा हप्ता लवकर किंवा नंतर मिळेल.