ध्यास विश्वसार्ह बातमीचा

२४ दिवसात आवताडे शुगरचे एक लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप-संजय आवताडे

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आवताडे शुगर्स अँण्ड डडिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने ४ नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोळी पूजन करून प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ केला होता तेव्हापासून २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता एक लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून कमी कालावधीत जास्त गाळपाचा उच्चांक केला असल्याचे कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना चेअरमन संजय आवताडे म्हणाले की कारखाना घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात युद्ध पातळीवर कारखान्याची सर्व यंत्रणा भरून कारखाना सुरू करण्यामध्ये कामगारांचा मोलाचा वाटा आहे. या कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मादास चटके व कार्यकारी संचालक मोहन पिसे यांच्या कुशल सहाय्याने कमी कालावधीत आम्ही हा उचांक गाठू शकलो. या काळामध्ये तोडणी वाहतुक ठेकेदार, ऊस उत्पादक शेतकरी या सर्वांचे सहकार्य लाभल्यामुळे कमी कालावधीत चांगले गाळप झाले असून शेतकऱ्यानी आवताडे शुगर वर जो विश्वास दाखवला तो विश्वासास पात्र राहून शेतकऱ्यांना समाधानकारक दर देऊन हा कारखाना शेतकऱ्यांचा असल्याचे दाखवून देणार असल्याचे चेअरमन आवताडे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!