ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये अमोलराजे भोसले मित्र मंडळाकडून ‘जागर छत्रपतींचा, उत्सव स्वराज्याचा’ उपक्रम

अक्कलकोट, दि.24 : ‘जागर छत्रपतींचा-उत्सव स्वराज्याचा’ या संकल्पनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या अमोलराजे भोसले मित्र मंडळाकडून दि.19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने तालुक्यातील 117 ग्रामपंचायती, अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी नगरपरिषदेसह शासकीय-निमशासकीय कार्यालयांना एकाच दिवशी मंगळवारी छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट देवून विक्रम केला आहे.

अमोलराजे भोसले मित्र मंडळाच्यावतीने शिवरायांची प्रतिमा देण्याचा संकल्प केल्याप्रमाणे मित्र मंडळाकडून नियोजनबद्द आखणी करण्यात आली. त्याप्रमाणे एकाच दिवशी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती, नगरपरिषद, शासकीय-निमशासकीय कार्यालयांना प्रतिमा पोहोचविण्याचा विक्रम केला आहे. यामध्ये प्रतिमा देत असताना संबंधित पदाधिकारी, अधिकारी यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक छत्रपतींची प्रतिमा देण्यात येवून कार्यालयात लावण्याचे देखील मित्र मंडळाने व्यवस्था केलेली होती.

याबाबत बोलताना मित्र मंडळाचे योगेश पवार (वाय.पी.), अमोलराजे भोसले मित्र मंडळाकडून छत्रपतीं जयंतीनिमित्त 117 ग्रा.पं.ना प्रतिमा देण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे प्रतिमेचे वाटप करण्यात आले आहे. छत्रपतींचा आदर्श बारा बलुतेदार, सर्व जाती धर्मांना घेवून स्वराज्य निर्माण केले. याचा जयजयकार होणेकामी ‘जागर छत्रपतींचा-उत्सव स्वराज्याचा’ या संकल्पनेतून शिवजयंती साजरी करण्याच्या दृष्टीने मित्र मंडळाकडून सदरचा निर्णय घेण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

गोटू माने बोलताना म्हणाले, सर्व शासकीय कार्यालया छत्रपती शिवाजी महाराजांची एकच प्रतिमा रहावी या हेतुने सदरची संकल्पना शिवजयंतीचे औचित्य साधुन अमोलराजे मित्र मंडळाने राबविलेले असल्याचे सांगितले.

‘जागर छत्रपतींचा-उत्सव स्वराज्याचा’ या संकल्पनेच्या माध्यमातून अमोलराजे भोसले मित्र मंडळाकडून एकाच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा वाटप करण्यात आले आहे. नेहमीच मित्रमंडळाकडून विधायक उपक्रमाला भर दिला जातो. स्वत: अमोलराजे भोसले देखील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य त्यांच्याकडून घडत आहे, असेच कार्य त्यांच्याकडून होत राहो, हीच आमची शुभेच्छा असल्याचे चपळगाव येथील प्रदिप सुरवसे यांनी व्यक्त केले. मित्र मंडळाकडून राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

याकामी मित्र मंडळाचे प्रविण घाटगे, राजाभाऊ नवले, आकाश शिंदे, प्रविण देवकर, सिध्देश्वर बिराजदार, विशाल कलबुर्गी, आतिष पवार, वैभव मोरे, भरत राजेगावकर, महेश दणके, विकास पवार, निखिल पाटील, बाळासाहेब पोळ, राहुल माने, गणेश पाटील, मधुकर मचाले, गोविंद निंबाळकर, बालाजी पाटील, सिध्देश्वर माळी, प्रसाद मोरे, गणेश गोब्बुर,शरदराव भोसले, रोहन शिर्के, राहुल शिंदे, श्री चव्हाण, देवेंद्र गावडे, समर्थ शिंदे, सतिश महिंद्रकर, विरेश धानशेट्टी, अनिल इंगळे यांनी ज्या-त्या भागात जावून ग्रामपंचायत, नगरपरिषद, शासकीय निमशासकीय कार्यालयांना छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!