ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात एकाच दिवशी १ हजार ३५ जणांना कोरोना लस,लसीकरण मोहिमेने घेतला वेग

अक्कलकोट : अक्कलकोट
शहर आणि तालुक्यात सध्या कोरोना लसीकरणाने चांगलाच वेग घेतला आहे. आज एका दिवसात तब्बल १ हजार ३५ जणांना ही लस दिली गेली.तालुक्यात आत्तापर्यंत १४ हजार ४४४ जणांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांनी ‘विश्व न्युज मराठी’ शी बोलताना दिली.

यात ग्रामीण मध्ये ७१६ आणि शहरात ३१९ ही जणांना लस देण्यात आली आहे. अक्कलकोट शहरात चार बुथवर व ग्रामीण भागामध्ये एकूण सतरा बुथवर ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेमध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी सुप्रिया डांगे, तहसीलदार अंजली मरोड, गटविकास अधिकारी महादेव कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांच्या निरीक्षणाखाली ही मोहीम तालुक्यात राबविण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर

आज राबविण्यात आलेल्या विशेष लसीकरण मोहिमेतील केंद्रांना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांनी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली.या लसीकरण मोहिमेस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड व कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उस्फूर्तपणे कामकाजात भाग घेतला आहे.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी विस्ताराधिकारी महेश भोरे, आरोग्य सहाय्यक एस.एस लोकापुरे, सुरेश भास्कर एन वाय दलाल, शिवाजी चंदनशिवे हे परिश्रम घेत आहेत.

★ मोहिमेला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा

सुरुवातीला प्रतिसाद कमी होता आता हळूहळू कोरोना लस घेण्याचे प्रमाण तालुक्या वाढत आहे.यासाठी आरोग्य विभाग देखील जनजागृतीच्या माध्यमातून सर्वांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत आहे.नागरिकांनी या मोहिमेला प्रतिसाद देऊन कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करावा – डॉ.अश्विन करजखेडे,तालुका वैद्यकीय अधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!