ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी अडवला उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा

बीड : बीडच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बीडमध्ये मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. मागच्या तीन ते चार दिवसांपासून रोज कोरोना रुग्ण वाढत आहेत. काल जिल्हाभरात तब्बल सव्वा दोनशे कोरोना रुग्ण आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

कोरोना संकटाच्या काळात आम्हाला कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक दिली. मात्र तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होण्याआधीच आम्हाला नोकरीवरुन काढल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!