---Advertisement---

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी २६जुनला भाजप करणार चक्का जाम आंदोलन

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्य सरकारमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप करत भाजपने २६ तारखेला चक्का आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक माजी मुख्यामंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला पंकजाताई मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, खा. रक्षाताई खडसे, अतुलजी सावे, डॉ. संजय कुटे, मनिषाताई चौधरी, जयकुमार गोरे, योगेश टिळेकर, चित्रा वाघ आणि इतर भाजप नेते उपस्थित होते.

ओबीसींचे अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलेले ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का बसला आहे. या निर्णयामुळे राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील नागरिकांत असंतोष आहे.

राज्य सरकार ओबीसींची बाजू नीटपणे मांडू शकले नाही, असे आरोप पंकजा मुंडे-पालवे यांनी केला आहे. हा विषय सर्वपक्षीय नेत्यांचा आहे. त्यासाठी आम्ही २६ तारखेला चक्का जाम करणार आहोत असे मुंडे यांनी ट्विट केली आहे.

राज्य सरकारमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. ओबीसी आरक्षणाचा केंद्राच्या जनगणनेशी काहीही संबंध नाही. राज्य सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केली आहे असे बावनकुळे यांनी म्हंटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!