ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सीईओ स्वामी यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत फक्त महिलांसाठी कोविड लसीकरण सत्र यशस्वी

सोलापुर :  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोविड लसीकरण कार्यक्रमात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी राखी पौर्णिमेचे औचित्य साधून खास महिला भगिनींसाठी सोमवारी 23 ऑगस्ट रोजी विशेष लसीकरण सत्राचे जिल्हाभरात आयोजन करण्याबाबत आरोग्य विभागाला आदेश दिले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आवाहनाला उत्स्फर्तपणे प्रतिसाद देत आरोग्य विभागाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व 77 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 3 उपजिल्हा रुग्णालय व 14 ग्रामीण रुग्णालयांच्या ठिकाणी केवळ महिलांसाठी लसीकरण सत्रांचे आयोजन केले होते.

सोलापूर जिल्ह्यात कोवीड लसीकरण कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध सुरू असून शनिवारी 21ऑगष्ट रोजी 177 लसीकरण केंद्रावर सायंकाळी 6 अखेर 43989 लाभार्थी लसीकरण झालेले आहेत. मोहीम सुरू झाल्यापासून आज सोलापूर जिल्ह्यात 873523 लाभार्थी पहिला डोस व 332704 लाभार्थी यांनी दूसरा डोस झालेला असून दोन्ही डोस मिळून 12 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. यामधे 667338 पुरुष लाभार्थी असून महिला लाभार्थी 538707 इतके आहे.

जिल्ह्यात राखी पौर्णिमेचे औचित्य साधून जिल्ह्यातील 77 प्रा आ केंद्र 14 ग्रामीण रुग्णालय व 3 उपजिल्हा रुग्णालय येथे फक्त महिलांसाठी पहिला आणि दुसरा डोस मिळून प्रत्येक प्रा आ केंद्र निहाय 100 डोस व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे 200 डोस लसीकरण करण्याचे नियोजन जिल्हा परिषद आरोग्य प्रशासनाने केले होते. तसेच या नावीन्यपूर्ण कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होउन लसीकरणाचा लाभ घ्यावा. याकरिता ग्राम पंचायतीने आपल्या गावातील महिलांना पुढाकार घेण्यासाठी प्रवृत्त करावे व सर्व महिलावर्गाला राखी पौर्णिमेची भेट ( ओवाळणी ) द्यावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप स्वामी यांनी केलेले होते. आज सोमवारी 23ऑगष्ट रोजी सायंकाळी 6-00 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 19510 महिलांना लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस 15291 दुसरा डोस 4219 एवढे लसीकरण झाल्याची नोंद झाली आहे. रात्री आठ पर्यंत 20 हजारच्या पुढे नोंद होईल असे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!