---Advertisement---

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; स्वीय सहाय्यका विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आज त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे या दोघां विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सक्तवसुली संचालनालयाकडून हे आरोपपत्र सक्तवसुली संचालनालय कोर्टात सादर करण्यात आले.

अनिल देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे अनिल देशमुख यांचे सचिव होते. या दोघांना 25 जून रोजी अटक करण्यात आली होती.

ईडीने आतापर्यंत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाचवेळा समन्स बजावले आहेत. मात्र, पाचही वेळा देशमुख प्रकृतीचे कारण देत ईडी कार्यालयात हजर राहिले नाहीत. अनिल देशमुख यांनी एक महत्त्वाचे निवेदन देत ईडीसमोर हजर होण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः ईडीच्या समोर जाणार आहे व त्यांना सहकार्य करणार आहे, असं अनिल देशमुखं यांनी म्हटलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!