ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात स्वामी समर्थांचा प्रकट दिन भक्तीभावात साजरा

अक्कलकोट :दिगंबरा दिगंबरा…. श्रीपाद वल्लभ दिगंबरा….! श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! श्री अन्नपूर्णा माता की जय..!! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गुरुवारी श्रींच्या प्रकट दिनानिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून महाप्रसादाच्या उत्कृष्ठ नियोजनाने स्वामी भक्तांनी समाधान व्यक्त केले. लाखो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले.

दरम्यान न्यासाच्या महाप्रसाद गृहात पुरोहित संजय कुलकर्णी, विश्वंभर पुजारी आणि सोमनाथ कुलकर्णी यांच्या हस्ते विधिवत पूजा, धार्मिक कार्यक्रम भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्रींना नैवेद्य दाखविण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचा संकल्प सोडण्यात आला. यानंतर महाप्रसादास सुरुवात करण्यात आले.

महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंद्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, केरळ, गुजरात, उत्तराखंड, दिल्ली व जम्मू काश्मीर पंडीत, राजस्थान, उत्तरप्रदेश वाराणसी यासह देश व विदेशातील स्वामी भक्तांनी तीर्थक्षेत्री श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात येऊन लाखो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले.

स्वामी भक्तांनी अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या श्री शमी-विघ्नेह गणेश मंदिर, ब्रह्मांडनायक उभी स्वामींची मूर्ती, नियोजित महाप्रसादगृह इमारत, सध्याचे अद्यावत तात्पुरते महाप्रसादालय, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, कार्यरत यात्री निवास-1, यात्रीभुवन-2, अतिथी गृह, आऊटडोअर व इनडोअर जीम, प्रशस्त वाहनतळ, टेकडीवरील श्री समर्थ वाटिका, शिवचरित्र प्रदर्शन हॉल, अग्निशमन, रुग्णवाहिका, आश्रयदाते कक्ष हे सर्व न्यासाचे विविध उपक्रम भक्तांच्या सेवेर्थ सुरु केलेल्या विविध उपक्रम व व्यवस्थेचे स्वागत करुन न्यासाचे कौतुक केले.

प्रकट दिनानिमित्त अन्नछत्र मंडळात विविध क्षेत्रातील आलेल्या मान्यवरांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मंडळाचे विश्वस्त अर्पिताराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, श्री व सौ. विशाल मगर, राजेंद्र लिंबीतोटे, संतोष भोसले, अशोकराव जाधव (मामा), वैभव नवले, वैभव मोरे, सौरभ मोरे, प्रथमेश पवार, शुभम चव्हाण, अभियंता अमित थोरात, पिंटू साठे, प्रवीण घाडगे, विजय माने, निखील पाटील, राहुल इंडे, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, सतिश महिंद्रकर, गोरखनाथ माळी, सुमित कल्याणी, नामा भोसले, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, समर्थ घाडगे, देवा हंजगे, संभाजीराव पवार, प्रसाद हुल्ले, बाबुशा महिंद्रकर रमेश हेगडे, राजेश काटकर, राजू पवार, गोविंदराव शिंदे, रवी श्रीमान, बलभीम पवार, गणेश लांडगे, धनंजय गडदे, स्वामीराव मोरे, किरण भोसले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

न्यासाकडून महाप्रसादाचे उत्कृष्ठ नियोजन :

देव दर्शनासाठी देशातील विविध राज्यात जाण्याचा योग आला. आजच्या प्रकट दिनाच्या दिवशी श्रीक्षेत्र अक्कलकोटला आलो असता, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात लाखो स्वामी भक्त महाप्रसादाकरिता आलेले होते. त्याठिकाणी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून महाप्रसादाचे उत्कृष्ठ नियोजन व व्यवस्थापन पाहून माझ्यासह स्वामी भक्तांनी समाधान व्यक्त केले – मनोज वाडेकर, केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी यांचे विशेष कार्य अधिकारी, नवी दिल्ली

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!