ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डायव्हिंग स्विमिंग प्रकारात सोलापूरचे १४ जण राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले, दि. १९ ते २३ ऑक्टोंबर दरम्यान बेंगलोर येथे होणार राष्ट्रीय स्पर्धा

सोलापूर : डायव्हिंग स्विमिंग प्रकारात सोलापुरातील १४ जण राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी दि.२९ व ३० सप्टेंबर २०२१ रोजी मुंबई येथे ही स्टेट लेवल डायव्हींग ट्रायल्स घेतली. आता स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी ग्लेनमार्क ३७ वी सब ज्युनियर व ४७ वी ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पीयनशिप-२०२१ ही स्पर्धा दि.१९ ते २३ ऑक्टोंबर २०२१ दरम्यान बेंगलोर येथे आयोजीत केली आहे.या सर्व यशस्वी स्पर्धकांचा सोलापूर मनपा उपायुक्त धनराज पांडे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्योजक प्रल्हाद काशीद, स्विमिंग कोच श्रीकांत शेटे, स्टॅम्प व्हेंडर प्रताप सूर्यवंशी उपस्थित होते.

यामध्ये १४ वर्षे वयोगटात – मुली मध्ये – श्रावणी सुर्यवंशी हीने १ मी. स्त्रींगबोर्ड, ३ मी. स्पींगबोर्ड, व हायबोर्ड या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला, तर सम्राज्ञी गाडेकर हिने १मी. स्त्रींगबोर्ड व हायबोर्ड या प्रकारात, व आभा मलजी हीने ३ मी. स्त्रींगबोर्ड प्रकारात व्दितीय क्रमांक पटकाविला. तर मुलांमध्ये – सोहम आदिनोलू यानेही १ मी. स्पींगबोर्ड व हायबोर्ड या दोन्ही प्रकारात प्रथम, तर ३ मी. स्त्रींगबोर्ड या प्रकारात व्दितीय क्रमांक पटकाविला. तर कर्तव्य खैरमोडे याने हायबोर्ड प्रकारात व्दितीय क्रमांक पटकाविला.

१७ वर्षे वयोगटात – मुली मध्ये – पूर्वा लिगाडे हीचे ३ मी. स्पींगबोर्ड व हायबोर्ड या दोन्ही प्रकारात व रुतू लिगाडे हीचे ३ मी. स्पींगबोर्ड प्रकारात करीता निवड करण्यात आली. तसेच १७ वर्षे वयोगटात – मुलांमध्ये – सोहम शेटे याचे १ मी. स्पींगबोर्ड व हायबोर्ड या दोन्ही प्रकारात निवड करण्यात आली.

१९ वर्षे वयोगटात – मुली मध्ये – रिया मुस्तारे हीने १ मी. स्प्रींगबोर्ड या प्रकारात व्दितीय क्रमांक पटकाविला, तर मुलांमध्ये – ओम अवस्थी याने १ मी. स्प्रींगबोर्ड, ३ मी. स्त्रींगबोर्ड, व हायबोर्ड या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच याच वयोगटात मुलांमध्ये श्रीकांत कोंढारे यांने १मी. स्पींगबोर्ड व हायबोर्ड या प्रकारात व्दितीय क्रमांक पटकाविला, तर वरुण दोरनाल यांने ३ मी. स्त्रींगबोर्ड या प्रकारात व्दितीय क्रमांक पटकाविला.

तसेच खुल्यागटात मुलामध्ये – ओम अवस्थी याची तिन्ही बोर्डासाठी व निहाल गिराम याची हायबोर्ड साठी निवड करण्यात आली. तसेच मुलीमध्ये बिल्वा गिराम हीची तिन्ही बोर्डासाठी निवड करण्यात आली. या सर्व खेळांडूना कोच – श्रीकांत शेटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच १०० मी. बटरफ्लाय या प्रकारात वेदांत सामलेटी याने व्दितीय क्रमांक पटकाविला आहे, यास कोच-श्रीकांत दोरनाल यांचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व खेळाडूसाठी मनपा आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, क्रिडा अधिकारी नजीर शेख, सोलापूर जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष सुदेश देशमुख व सचिव पार्वतय्या श्रीराम यांनी जलतरण तलाव उलपब्ध करुन मोलाचे सहकार्य केले आहे. त्यामुळे वरील सर्व खेळाडूनां अशाप्रकारचे घवघवीत यश संपादन करता आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!