ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने वर्तवला अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून २२ ऑक्टोबरपर्यंत ते चक्रीवादळाचे रूप धारण करू शकते,तेअसे हवामान खात्याने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या ४८ तासांत दक्षिणपूर्व आणि पूर्व-मध्य दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र प्रभावी ठरू शकते. त्यानंतर ते पश्चिमेकडे सरकेल. २२ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. यामुळे ओडिशा सरकारने २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. या शिवाय किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने या चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तामिळनाडू, केरळसह १० राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी मान्सूनला उशीर झाला आणि आता वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रात पुण्यात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. त्याचबरोबर तामिळनाडू आणि केरळमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!