अक्कलकोट,दि.१० : समाजात अनेक प्रकारच्या संस्था काम करतात परंतु रोटरीमुळे येथे काम करणाऱ्यांची देखील वेगळी ओळख झाली आहे.यामुळे सामाजिक बंधुभावात वाढ होत असल्याचे प्रतिपादन रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश चन्ना यांनी केले.
शनिवारी, अक्कलकोट रोटरी क्लबचा २०२१-२२ चा पद्ग्रहण सोहळा अक्कलकोट येथील ग्रीन रिसॉर्ट व्हिलेज रोटरी हॉल येथे सामाजिक अंतर ठेवून व कोविड १९ च्या सर्व नियमाचे पालन करून संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाला पाणी घालून व दीपप्रज्वलनाने झाली.
यावर्षीचे अध्यक्ष म्हणून दिनेश पटेल, सचिव अमोल पाटील, कोषाध्यक्ष सिद्धाराम उडचण व इतर पदाधिकाऱ्यांनी मावळते अध्यक्ष जितेंद्रकुमार जाजू ,सचिव सुनील बोराळकर, कोषाध्यक्ष योगीराज गंभीरे व पदाधिकारी यांच्याकडून पदभार स्वीकारला. उपप्रांतपाल कालिदास माणेकरी यांनी पद्ग्रहण अधिकारी म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्रांतपाल व्यंकटेश चन्ना हे होते.
रोटरी या संस्थेत सामाजिक जाणिवा
जागृत असल्यामुळे रोटरी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचत आहे व या सेवाभावी कार्यामुळे समाजात शांतता व सलोखा निर्माण होण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन रोटरीचे डिस्ट्रिक्ट माजी गव्हर्नर व्यंकटेश चन्ना यांनी यावेळी काढले.
पुढील वर्षभरात अक्कलकोट रोटरी अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेणार आहे. अक्कलकोटच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक,व कोरोना महामारी,महिला सबलीकरण, अशा सर्व क्षेत्रांमध्ये भरीव कार्य करणार असल्याचे नूतन अध्यक्ष दिनेश पटेल यांनी सांगितले.
यावेळी माजी अध्यक्ष निनाद शहा,आनंद गंदगे,एजाज मुतवल्ली,विलास कोरे, अशोक येणेगुरे,राजकुमार कोकळगी, डॉ. विपुल शहा ,गजानन पाटील, वैजिनाथ तालीकोटी, नीलकंठ कापसे, स्वामींनाथ हिप्परगी आदि रोटरी सदस्य व महिला सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले व आभार ज्योती पाटील यांनी मानले.