ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विजयादशमीच्या मुहूर्तावर वटवृक्ष मंदिरातील अतिथी कक्षाचे उद्घाटन 

अक्कलकोट –  येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्यालयातील अत्याधुनिक व वातानुकूलित नूतन अतिथी कक्षाचं उद्घाटन सोहळा विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या थाटामाटात व उत्साहात पार पडला.  मंदिर समितीचे पुरोहित गुरुवर्य मोहनराव पुजारी यांच्या हस्ते व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थित रिबीन कापून हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी अमोलराजे भोसले व  मोहनराव पुजारी तसेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त अभय खोबरे, अक्कलकोट नोर्थ पोलीस ठाण्याचे पी. आय.  अनंत कुलकर्णी, सौ व श्री भिमाशंकर गुरव, बनकर, फुलारी, अमर पाटील या प्रमुख मान्यवरांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. अमोलराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने महेश इंगळे व कुटुंबियांचा अमोल राजे यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळा देऊन तर गुरुवर्य मोहनराव पुजारी यांनी स्वामींचे  कृपा वस्त्र व आशीर्वाद देऊन गौरव केला.

याप्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थ महाराज हे संन्यासी सत्पुरुष होते.  आजवर देवस्थान समितीवर कार्यरत राहिलेले विविध प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्वामींच्या जीवन कार्याची  प्रेरणा घेऊन साधेपणाचा वसा जोपासलेला होता.  त्यामुळे मंदिर व परिसरात व कार्यालयात आज पर्यंत अत्यंत साधेपणाचे वातावरण निर्गमित असायचे, परंतु काळानुरूप परिस्थिती बदलत गेली.  भाविकांची संख्या वाढत गेली.  यथावकाश देश व राज्यातील विविध पदावरील उच्चपदस्थ अधिकारी स्वामींच्या दर्शनाकरिता नियमितपणे येऊ लागले.  जुन्या कार्यालयात त्यांची व्यवस्था करण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या त्यामुळे काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मंदिर परिसरात एखादे सुसज्ज व भव्य वातानुकूलित अतिथि कक्षाची निर्मिती केल्यास मंदिर समित स व येणाऱ्या भाविकास अत्यंत सोयीचे होईल अशी सूचना वारंवार आम्हाला मिळत होती, त्या सूचनेस दखल घेऊन या अतिथी कक्षाचे काम मंदिर समितीने हाती घेऊन आज दसऱ्याच्या मुहूर्तावर त्याचे शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली असल्याचे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान धर्मसंकीर्तन समितीचे संयोजक डॉ.  हेरंबराज पाठक यांनी केले तर आभार  प्रा. शिवशरण अचलेर यांनी मानले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, रुपाली इंगळे, प्रथमेश इंगळे, चंद्रकांत सोनटक्के, अविनाश मडीखांबे, श्रीशैल गवंडी, संजय पवार, विपूल जाधव, गिरीश पवार, खाजप्पा झंपले, संतोष जमगे, रवि मलवे, प्रवीण घाटगे, बाळासाहेब घाटगे, संतोष भोसले, पिंकू गोंडाळ, मनोज निकम, बाळासाहेब पोळ, सचिन किरनळ्ळी, विश्वास शिंदे, दिनकर शिंपी, सागर गोंडाळ, स्वामीनाथ लोणारी, संतोष पराणे, ऋषिकेश लोणारी, प्रसाद सोनार, संजय पवार, ज्ञानेश्वर भोसले इत्यादी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!