अक्कलकोट : प्रतिनिधी
दरवर्षी अक्कलकोट येथील प्रसिद्ध व्यापारी व प्रगतशील शेतकरी प्रमोद पाटील व संयोजक शिवराज बिराजदार यांच्या शेतात समाजातील सर्व स्तरातील लोकांनी जवळपास महिनाभर हुरडा महोत्सवात सामिल होऊन गरमागरम हुरड्याचा आस्वाद घेत असतात, यामुळेच पाटील व बिराजदार परिवारांना एक प्रकारे समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
अक्कलकोट येथे उद्योजक, प्रगतशील शेतकरी प्रमोद पाटील, संयोजक युवा नेता शिवराज बिराजदार आयोजित हुरडा महोत्सव २०२५ चे श्री.म.नि.प्र अभिनव शिवलिंग महास्वामीजी विरक्त मठ मादन हिप्परगा व पूज्य श्री.म.नि.प्र. बसवलिंग महास्वामी,विरक्त मठ, अक्कलकोट आणि डॉ. ईश्वरानंद स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात तर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते या हुरडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुंबईचे उद्योगपती किरण हंचाटे हे होते. हुरडा महोत्सवाचे उद्घाटन करताना आमदार कल्याणशेट्टी हे बोलत होते. हुरडा महोत्सवाचे यंदाच्या १७ वे वर्ष आहे.
यावेळी श्री म.नि.प्र अभिनव शिवलिंग महास्वामीजी व पूज्य श्री.म.नि.प्र. बसवलिंग महास्वामी यांनी आशीर्वाचन पर बोलताना म्हणाले की,आज समाजात पैसा ,संपत्तीने अनेक लोक श्रीमंत असतात,परंतु प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार सारखे परोपकारी मनाने श्रीमंती लाभलेले माणस मात्र फारच कमी पहावयास मिळतात.कारण गेल्या सोळा वर्षांपासून परोपकारी वृत्तीने हुरडा महोत्सव सुरू असून, यंदाच्या महिनाभर सर्व स्तरातील माणसांना प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार यांनी हुरड्याचा आस्वाद देऊन माणूसकीचे दर्शन घडवून आणली.अशी घडविणारी माणस आज फारच दुर्मिळ पहायला मिळत असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी, आज समाजात अनेक परोपकारी माणस भेटतात ते नेहमीच दुसर्यांच्या सुख दुख:त सामिल होऊन माणूसकीचे दर्शन घडवत असतात.अशीच परोपकरी माणस आज समाजात पुढे येत असतात.अशा माणसांच्या पाठीमागेच ईश्वर आशीर्वाद असल्याचे मत भाजपाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
वर्षाकाठी जवळपास सात लाख रूपयाचे उत्पन्न न घेता स्वतःच्या व्यापार व्यवसायाकडे दुर्लक्ष करून दररोज सुमारे चारशे पेक्षा जास्त लोकांना मोफत हुरड्याचा आस्वाद देऊन दरवर्षी महिना दीड महिना हुरडा महोत्सव गेल्या १६ वर्षापासुन सतत सुरू असलेल्या प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार हुरडा महोत्सवाला जिल्हा भरातुन वाढता प्रतिसाद मिळत असतो.
हे हुरडा महोत्सव चे यंदाच्या १७ वे वर्ष असुन प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार स्वतः येणाऱ्या सर्वांना आस्थेने हुरडा खाऊ घालतात.प्रमोद पाटील हे व्यापारी असुन त्यांची जवळपास एकूण ४५ एकर शेती आहे. त्यामध्ये जवळपास विविध ज्वारीचे अनेक नमुने आदी पीके घेत असुन जवळपास ४ ते ५ एकर फक्त हुरडासाठी दरवर्षी राखुन ठेवलेले आहे.हुरडा माक्रेटिंग केले जाते.राहिलेल्या ज्वारीचे बी व वाळलेल्या हुरड्याची रास करून नागरिकांना मोफत दिले जाते.सुरती, कचकची, नरीबाला, फुले ,उत्तरा गुळबंडी आदी जातीचे हुरडा असतात.दरवर्षी जानेवारी मध्ये हुरडा महोत्सवास सुरू होते असुन ते महिना सव्वा महिना सुरू असते. यासाठी राजकिय, सामाजिक, सर्व समाज घटकातील, सर्व धर्मीय उपस्थित राहतात.स्वतःचे व्यापार व्यवसाय सोडुन प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार हुरडा सेवा करतात.बाळप्पा भडोळे व नागराज कुंभार यासह चार जण कणसे सोलुन देतात तर चार महिला कणसे काढुन आणतात.कणसे चोळण्यासाठी स्वत: प्रमोद पाटील हे हातमोजे वापरून घोळ काढण्यासाठी चाळणीचा वापर केला जातो. सोलापूर, मुंबई, पुणे, कर्नाटकातून देखील पुष्कळ जण, परदेशी पर्यटक येत असतात. काही नातेवाईक त्यांच्या नातेवाईक यांना परदेशात हुरडा पाठवित असतात.काही शाळांचे गेटटुगेदर या हुरडा महोत्सव निमित्त होतात. सर्वांमध्ये स्नेहभाव वाढावा, सहकार्य भावना वाढावा या उद्देशाने हुरडा महोत्सव सुरू केले. व्यापारी तत्व नाही. स्नेह बंधुभाव समाजकार्य वाढावा म्हणून हे हुरडा पार्टी होते.
यावेळी कलबुर्गीचे भाजप मा.जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योजक किरण भैय्या हंचाटे,हुरडा महोत्सवाचे आयोजक प्रमोद पाटील व संयोजक शिवराज बिराजदार,राजकुमार झिंगाडे, विश्राम पटेल, सिद्धाराम अळ्ळीमोरे,सोमशेखर जमशेट्टी,नंदू हंचाटे यांच्यासह अनेक मान्यवर या हुरडा महोत्सवास उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.