ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बांधकाम व्यावसायिकावर बेछुट गोळीबार !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत असतांना आता चेंबूरमधील आचार्य अत्रे उद्यानाजवळील सिग्नलजवळ एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री सुमारे 9.50 वाजता घडली. दोन अज्ञात बाईकस्वारांनी सद्रुद्दीन खान (वय 50) या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दरम्यान सद्रुद्दीन खान यांना एक गोळी त्यांच्या गालाला चाटून गेली, तर दुसरी गोळी त्यांच्या गाडीला लागून काचा फुटल्याची माहिती आहे. गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होते पंचनामा केला आहे.

सद्रुद्दीन खान यांना उपचारासाठी झेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार का आणि कुणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. सायन-पनवेल हायवेवरून पनवेलच्या दिशेने जात असताना अचानक दोन बाईकस्वार आले आणि त्यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या डिफेंडर गाडीवर गोळीबार केला.संबंधित बांधकाम व्यावसायिक हा खासदार वर्षा गायकवाड यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती सूंत्रानी दिली आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी सद्रुद्दीन खान यांची भेट घेत प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

आरोपींच्या शोधासाठी पाच पथके स्थापन करण्यात केली आहेत असे पोलीसांनी सांगितले आहे. गोळीबारानंतर एका लेनची वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्यामुळे येथे एरव्ही देखील प्रचंड ट्रॅफीक असते. या घटनेने येथे घबराट पसरून आणखीन गोंधळ उडाला. संपूर्ण सायन ते पनवेल महार्गावरील ट्रॅफीक त्यामुळे जाम झाले आहे. फोरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपायुक्त ढवळे येथे दाखल झाले असून स्थानिक परिसरात येथे सीसीटीव्हींचे जाळे असल्याने त्याचा आधार घेऊन आरोपींचा शोध सुरु झाला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group