नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकार गेल्या काही वर्षापासून देशातील महागाई कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. परंतु सर्व प्रयत्न करूनही मोदी सरकारला महागाई कमी करण्यात यश येत नाहीये. याचदरम्यान किरकोळ महागाई दराचा आकडेवारी जाहीर करण्यात आलीय. या आकडेवारीनुसार डिसेंबर २०२३ मध्ये डाळ आणि त्यांचे काही इतर उत्पादनांच्या महागाईत २०.७३ टक्क्यांची वाढ झालीय.
डिसेंबर २०२३ मध्ये डाळींचा महागाई दर २०.७३ टक्के राहिलाय. तर एका मागील वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये हा दर ३.१५ टक्के होता. या आकड्यातून आपल्याला स्पष्ट होतं की, एका वर्षाच्या काळात किरकोळ महागाईच्या दरात १७.५८ टक्क्यांनी वाढ झालीय. यामुळे सामन्य लोकांचा बजेट बिघडलाय. वाणिज्य मंत्रालयद्वारे १५ जानेवारी २०२४ ला डिसेंबर २०२३ च्या घाऊक महागाई दराचे आकडे जाहीर करण्यात आले आहे.
ज्यात वाढ झालीय. घाऊक महागाईच्या दरात केवळ डाळींच्या महागाईत १९.६० टक्क्यांची वाढ झालीय. किरकोळ महागाई असेल किंवा घाऊक महागाईमध्ये डाळींच्या महागाईत एका वर्षात मोठी वाढ झालीय. सर्व डाळींपैकी तूर डाळीला जास्त मागणी आहे. याबाबतचा अहवाल ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केला आहे. त्यानुसार १४ जानेवारी २०२४ रोजी किरकोळ बाजारात तूर डाळीची किंमत १५१.८८ रुपये प्रति किलो होती. वर्षभरापूर्वी तूर डाळीच्या किंमत प्रति किलो ११०.८३ रुपये होती. अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत तूर डाळीच्या किमतीत ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.