ध्यास विश्वसार्ह बातमीचा

समृद्ध भारतासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा ; पंतप्रधान मोदींचे अभिवादन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. महाराजांचे पराक्रमाचे धडे जगभरात दिले जाते. शिवजयंतीनिमित्त अवघा महाराष्ट्र शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवजयंतीनिमित्त एक खास व्हिडिओ पोस्ट करून शिवरायांना अभिवादन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असे पतंप्रधान नरेद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!