ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करणे गरजेचे

अक्कलकोट येथे ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

मराठी ही आपली मातृभाषा आहे.मराठी भाषेचा वापर दैनंदिन जीवनात करणे गरजेचे आहे.मराठीमध्ये साहित्य मोठ्या प्रमाणावर असून वाचकांनी वाचन केले पाहिजे. वाचनाने बुद्धिमत्ता वाढीस मदत होते, असे प्रतिपादन ऍड. प्रशांत शहा यांनी केले.

कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती व मराठी राजभाषा दिनानिमित्त श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालय व महाराष्ट्र साहित्य परिषद अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ऍड. शहा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषेचा दर्जा वाढविण्यासाठी शासनाने गाव तेथे ग्रंथालय सुरू केले आहे. प्रत्येक ग्रंथालयात मराठीचे साहित्य, ग्रंथ, धार्मिक पुस्तके, विविध लेखकांची दर्जेदार पुस्तके आहेत. मराठी ही मायबोली असून मायबोलीवर प्रत्येकाने प्रेम केले पाहिजे. मराठीचे साहित्य संमेलन देशातील विविध राज्यात व परदेशात होत आहेत हे वैशिष्ट्य आहे,असे संस्थेच्या अध्यक्षा शैलशिल्पा जाधव यांनी सांगितले.

याप्रसंगी संस्थेचे सचिव लक्ष्मण पाटील, पुष्पा हरवाळकर ग्रंथपाल दत्तात्रय बाबर, दिनकर शिंपी, स्नेहा नरके, रतनचंद आळंद, चंद्रकांत पोतदार, चंद्रशेखर आडवीतोटे, बसवराज रोडगे, लक्ष्मण शिरगुरे, गुरुदत्त मंगरुळे, महादेव शिरसाटे,तुकप्पा हरवाळकर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!