ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जगताप प्रकरण; अक्कलकोट तालुका तलाठी संघातर्फे तहसीलसमोर निदर्शने

अक्कलकोट  : महाराष्ट्र राज्य तलाठी संघ सोलापूर शाखा अक्कलकोट तालुका तलाठी संघाच्यावतीने ई महाभुमी राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी असलेले रामदास जगताप यांनी केलेल्या अर्वाच्य भाषेत केलेल्या वक्तव्याबद्दल अक्कलकोट येथे तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्यावतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले. कामकाज बंद ठेवले.

महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी सध्या राज्यातील नैसर्गिक आपत्ती ई-पीक पाहणी आणि मोफत ७/१२ व ८ अ खातेदारांना वितरण या संदर्भात मंगळवार दि.५ ऑक्टोबर रोजी तलाठी पटवारी मंडळाधिकारी यांना मार्गदर्शनपर राज्य कार्यकारणी या व्हाट्स अप ग्रुपवर मेसेज पाठवला होता. तो अन्य ग्रुपद्वारे रामदास जगताप यांना मिळाला त्यावर त्यांनी व्हाट्सअप ग्रुपवरचे “मूर्खां सारखे मेसेज पाठवू नका” असे लिहून डुबल यांना मूर्ख ठरवले व पर्यायाने राज्यातील सर्व तलाठी मंडळाधिकारी तलाठी संवर्गातील अव्वल कारकून व नायब तहसीलदार यांना अपमान केलेला आहे.  त्यामुळे तीव्र स्वरूपाच्या भावना असून जगताप यांची तात्काळ बदली करावी, अशा निवेदनाचे पत्र तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांना सगळ्यांच्या वतीने देण्यात आले असून तहसील कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत निदर्शने करण्यात आले. जगताप यांची बदली न केल्यास येणाऱ्या काळात सर्व कामावर बहिष्कार टाकण्यात येईल, असेही निवेदनात म्हंटले आहे.

यावेळी अककलकोट तलाठी संघटनेचे अध्यक्ष एस. पी.पाटील, उपाध्यक्ष समाधान काळे,सचिव आर.एस भासगी,कार्याध्यक्ष एन.के मुजावर,जी.एस.घाटे,जगताप, राजू कोळी, राहुल जमदाडे, सचिन चव्हाण, आय.के आतार, शरणप्पा पुजारी, एस. सी. जमादार यांच्यासह तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!