अक्कलकोट, दि.१५ : आचेगाव ( ता.दक्षिण सोलापूर ) येथील जयहिंद शुगर प्रा लिमिटेड च्या वतीने दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सोलापूर येथील शिवस्मारक सभागृहात सुवर्ण कृषी ऊस तंत्रज्ञान मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने-देशमुख यांनी दिली.अल्पखर्चात एकरी १०० टन ऊस उत्पादन घेण्यासाठी उस उत्पादक शेतकर्यांना विशेष तंत्रज्ञान संबंधित मार्गदर्शन या शिबिरात करण्यात येणार आहे.या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.अमोल पाटील पी.एच.डी. रसायनशास्त्र, संशोधन शास्त्रज्ञ ऊस उत्पादन तर नानासाहेब कदम सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक व व्यवस्थापक सुवर्ण कृषी ऊस तंत्रज्ञान, बार्शी व पंढरपूर हे सहभागी होणार आहेत.तरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन जयहिंद शुगर चे मुख्य कार्यकारी संचालक बब्रुवान माने-देशमुख यांनी केले आहे.