मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२१ : आचेगांव ( ता.दक्षिण सोलापूर ) येथे कै.हिंद केसरी हजरत पटेल यांच्या स्मरणार्थ निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते.यावेळी जयहिंद शुगर कारखान्यात काम करणारा कामगार पैलवान राहुल काळे यांनी पुणे येथील लोणी काळभोरच्या विनोद काळे यांना चितपट करुन आस्मान दाखवत २५ हजार रुपयांचे पारितोषिक जिंकले.तेव्हा जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने-देशमुख व मुख्य कार्यकारी संचालक बब्रुवान माने-देशमुख यांनी कारखान्यात काम करणाऱ्या कामगार राहुल काळे यांना रोख पंधरा हजार रुपये पारितोषिक देऊन जंगी मैदानातच त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.जयहिंद शुगरच्या परिवारांनी कारखाना कामगार राहुल काळे यांच्यावर दाखवलेल्या माणूसकीच्या दर्शनाचे मैदानात सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळाले.जयहिंद शुगर कडून नेहमीच एक सामाजिक बांधीलकी म्हणून कार्यक्षेत्रात विधायक कार्य पहायला मिळत आहे.मागच्याच महिन्यात उस उत्पादक शेतकरी बांधवासाठी संगीत संत तुकाराम मराठी नाटक आयोजित करुन शेतकरी बांधवांना संत तुकाराम महाराजांचे दर्शन घडविले होते.त्यानंतर संपूर्ण जिल्ह्य़ात उस उत्पादक शेतकऱ्यांच्या एकरी उस उत्पादनात वाढ व्हावी म्हणून तज्ञ मार्गदर्शकाकडून कार्य शाळा ही आयोजित करण्यात आली होती.तर आज आचेगांव येथे कै हिंद केसरी हजरत पटेल यांच्या जंगी कुस्त्यांच्या मैदानात कारखाना कामगार पैलवान राहुल काळेंना आर्थिक मदत करुन जयहिंद परिवरांनी प्रेक्षकांची मने जिंकली.यावेळी कारखाना एमडी आर.एम देशमुख,आचेगांवचे माजी सरपंच रमेश क्षीरसागर,हुसेन पटेल ,रेवणसिद्ध हत्तुरे यांच्यासह आचेगावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व संपूर्ण जयहिंद परिवार उपस्थित होता.