---Advertisement---

जयहिंदचे रोज ९ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप ;२१ नोव्हेंबरपर्यंतची सर्व बिले खात्यावर जमा

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट : गाळपाच्या पहिल्या दिवसापासून २१ नोव्हेंबर पर्यंत आलेल्या ऊसाला प्रतिटन २७०० रुपये पहिल्या हप्त्यापोटी जमा करण्यात आल्याची माहिती जयहिंद कारखान्याचे प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी दिली.

ऊस बिलासोबतच तोडणी वाहतूकदारांचीही २१ नोव्हेंबर पर्यंतची बिले अदा करण्यात आली आहेत.दररोज ९
हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात येत आहे.आजपर्यंत या हंगामातील १ लाख ५० हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात जयहिंद परिवार यशस्वी ठरला आहे.गळीत हंगाम पुर्ण होईपर्यंत दिलेल्या शब्दाप्रमाणे दर आठवड्याला ऊसबिले व वाहतुकदारांची बिले वेळेत अदा करण्यात येणार आहेत.त्यादृष्टीने आर्थिक नियोजन करण्यात आले आहे.तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस जयहिंद शुगरकडे गाळपाला देण्याचे आवाहन बब्रुवान माने देशमुख यांनी केले.

वाहतुकदारांसाठी
आकर्षक योजना

जयहिंद शुगरकडून तोडणी वाहतूकदारांची देखील बिले वेळेत अदा करण्याचे काम सुरू आहे.तोडणी वाहतूकदारांना जयहिंद कडून ८५ टक्क्यांपर्यंत कमिशन अदा करण्यात येत आहेत.ऊस उत्पादकांचा ओढा दिवसेंदिवस जय हिंद शुगर कडे वाढत असून उपलब्ध वाहतूक यंत्रणेत आणखीन गाड्यांची आवश्यकता वाढली असून वाहतूकदारांनी
जय हिंद प्रशासनाशी संपर्क साधावा.

बब्रुवान माने देशमुख,प्रेसिडेंट,जयहिंद शुगर

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!