ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात राजकीय खळबळ : जयंत पाटलांनी घेतली मध्यरात्री मंत्री बावनकुळे यांची भेट

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील छोट्या मोठ्या पक्षातील नेत्यांसह कार्यकर्ते महायुतीमध्ये प्रवेश घेत असतांना नुकतेच आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या भेटीमुळे जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयंत पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या मुंबई स्थित बंगल्यावर भेट घेतली. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने या दोघांची भेट घडवून आणली. या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेचा तपशील पुढे आला नाही, पण ही भेट जयंत पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाभोवती फिरती असल्याचा दावा केला जात आहे.

दुसरीकडे, स्वतः जयंत पाटलांनी आपण चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले आहे. पण त्याचवेळी त्यांनी ही राजकीय भेट नसल्याचेही ठणकावून सांगितले आहे. ते म्हणाले, काल सायंकाळी 7.50 वा. त्यांच्या घरी माझी भेट झाली. सांगली जिल्ह्यातील काही महसुली प्रश्नांवर मी काही 10-12 निवेदने दिली. ही निवेदने देण्यासाठी मी त्यांची वेळ मागितली होती. महसूल विभागात सात बारा ऑनलाईन केलेत. अनेक शेतकऱ्यांचे सातबारा चुकलेत. पण त्याच्या दुरुस्त्या वेळेवर होत नाहीत. हा सर्व महाराष्ट्राचा प्रश्न होता. त्याकडे त्यांचे लक्ष वेधले. अनेक जमिनींना एक्वायर झालेल्या नोटीसी दिल्यात. त्याच्यावर शिक्के मारलेत. पण या जमिनीचे भूसंपादनही झाले नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा मोबदलाही दिला नाही. असे आमच्या जिल्ह्यातले विविध प्रश्न होते. यासाठी मी त्यांना भेटलो. आमची भेट 6 वा. होणार होती. पण त्यांची हिअरिंग बराचवेळी चालली. 6.50 वा. ते त्यांच्या घरी आले. त्यानंतर मी त्यांची भेट घेतली. आम्हा दोघांत 25 मिनिटे चर्चा झाली. त्यात कोणतीही राजकीय झाली नाही. माझ्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील होते. स्टाफ होता. माझ्यासोबत शिष्टमंडळातील 4-5 जण होते. तुम्हाला मी दिलेल्या निवेदनांचे रेकॉर्डही पाहता येईल, असे जयंत पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!