ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठा बांधवांनी आरपारच्या लढाईत सामील व्हा !

अक्कलकोट : प्रतिनिधी

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील होणाऱ्या आंदोलनास बहुसंख्येने तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वयक राजन जाधव यांनी केले. ते सोमवारी राजे फत्तेसिंह चौक, थोर समाजसेवक कै.सर्जेराव जाधव मार्गावरील श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या सभागृहात तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या नियोजित मुंबई दौऱ्याच्या आयोजित बैठकी प्रसंगी राजन जाधव हे बोलत होते. दरम्यान शिव छत्रपती शिवाजी महाराजाच्या मूर्तीचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या बैठकी करिता सोलापूरचे सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक माऊली पवार, प्रा.गणेश देशमुख, रवी मोहिते, अनंतनेता जाधव, अँड. श्रीरंग लाळे, जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी, शिवाजीराव पाटील, अमोलराजे भोसले, महेश इंगळे, बाबासाहेब निंबाळकर, तम्मा शेळके, प्रकाश पडवळकर, बाळासाहेब मोरे, अमर शिंदे, सुभाष गडसिंग, सुधाकर गोंडाळ, अरुण साळुंखे, मोहनराव चव्हाण, पिंटू सोनटक्के आदिजण उपस्थित होते.

पुढे बोलताना समन्वयक राजन जाधव म्हणाले की, मराठा समाज बांधवांनी या आरपारच्या लढाईत सामील होऊन आपल्या हक्काचे आरक्षण मिळवूच असा निर्धार जाधव यांनी व्यक्त केले. राज्य समन्वयक माऊली पवार यांनी म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. यामुळे सकल समाज बांधवांनी या झोपलेल्या केंद्र व राज्य सरकारला जागे करण्या करिता मुंबईच्या लढाईत तालुक्यातील समजा बांधवांनी सामील होण्याचे आवाहन पवार यांनी केले.
याप्रसंगी सोलापूरचे प्राध्यापक गणेश देशमुख, अँड.श्रीरंग लाळे, रवी मोहिते, अनंतनेता जाधव यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा सांगून, आरक्षणाच्या बाबतीत आजपर्यंतच्या सरकारचे अपयशाची माहिती दिली व मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा खरपूस समाचार उभयतांनी घेतला.

याबरोबरच बाबासाहेब निंबाळकर, अमोलाराजे भोसले व महेश इंगळे यांनी अक्कलकोट शहर तालुक्यातून मराठा समाज बांधव एकत्रित येऊन जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने घालून दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मुंबईकडे निघतील असे सांगून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात तालुक्यातील समाज बांधवाने हजारोंच्या संखेने सामील होण्याचे आवाहन यावेळी केले.

यावेळी मनोज निकम, वैभव नवले, बालाजी जाधव, प्रशांत भगरे, अतुल जाधव, निखील पाटील, शीतल जाधव, बाळासाहेब पोळ, गोटू माने, राजेंद्र सूर्यवंशी, वरून शेळके, विजय पाटील, रवी कदम, बालाजी पाटील, महेश दनके, अतिश पवार, माणिकराव बिराजदार, दयानंद काजळे, रणजीत गोंडाळ, सागर गोंडाळ, रोहित खोबरे, मनोज इंगोले, श्रीकांत झिपरे, योगेश पवार, केदार तोडकर, विशाल कलबुर्गी, फहीम पिरजादे, सनी सोनटक्के, गोविंदराव शिंदे, स्वामीराव मोरे, भरत राजेगावकर, विकी गडदे, पिंटू साठे, राजू शिंदे, प्रदीप सुरवसे, प्रथमेश पवार, वैभव मोरे, अरुण टोणपे, विजय इंगळे, माणिकराव पवार, शुभम कामळूरकर, यशवंतराव भोसले, अनाद पवार, राहुल शेळके, सुभाष सुरवसे, आकाश शिंदे, प्रसाद मोरे, महेश भोसले, नितीन शिंदे, चंद्रशेकर वाकडे, मुन्ना कोल्हे, रोहित निंबाळकर, ऋषिकेश चव्हाण, गणेश पाटील, रमेश शिंदे, आबा सूर्यवंशी,आकाश सूर्यवंशी यांच्यासह तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.प्रकाश सुरवसे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!